जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) च्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी युनिट 3 च्या ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :– आज दिनांक २४/०४/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट 3 कडील अंमलदार पाहिजे / फरार /तडीपार आरोपींचा शोध घेत असताना सिंहगड रोड पो स्टे गु.र. नं २४३९/२०२० भादवि कलम ३९२,४४१,५०६,३४ सह आर्म ऍक्ट ४(२५) मपोका कलम ३७(१)१३५ या गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे विशाल सज्जन फाळके रा. मुक्काम पोस्ट वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली हा शिवाजीनगर कोर्ट च्या बाहेर मेट्रो स्टेशन जवळ उभा असल्याची माहिती स.पो.फौ.संतोष क्षीरसागर व पोलीस अंमलदार 8761 ज्ञानेश्वर चित्ते यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. सदर बाबत वरिष्ठांना यांना कळविले असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले. त्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता वर नमुद गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी हा सदर ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील चौकशी कामेयुनिट 3 कार्यालयात आणून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव, पत्ता विशाल सज्जन फाळके रा. मुक्काम पोस्ट वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली असे

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

