सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या हादीत अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर चा काळा बाजार करणा-या इसमावर पोलीसांनी छापा टाकुण ६१ गॅस टाक्या व गॅस टाक्या वाहुन नेणारा टेम्पो केला जप्त.
पंकेश जाधव संपादक 7020794626
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि.११/०१/२०२५ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तपास पथक कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार/ १०५१० सागर शेडगे व पोलीस अंमलदार/अमोल पाटील यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दत्तमंदिर निवृत्तीनगर कडे जाणारे रोडचे बाजुला असलेल्या मोकळ्या मैदानात वडगाव बु पुणे येथे एक इसम हा अनाधिकृतपणे स्वतःच्या फायद्या करीता सिलबंद घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करुन त्याची चोरुन अवैधरित्या विक्री करीत आहे.
अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळविल्याने मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अवैधरित्या विक्री करीत असलेल्या गॅस संदर्भात मिळालेल्या बातमीच्या ठिकाणाजवळ जावुन पाहणी केली असता दत्तमंदिर निवृत्तीनगर कडे जाणारे रोडचे आतील बाजुस असलेल्या मोकळ्या मैदानात वडगाव बु पुणे येथे एक क्रिम रंगाचा टेम्पो उभा असलेला दिसला, सदर टेम्पो मधुन एक इसम पिवळ्या रंगाच्या गॅस टाक्याची अवैधरित्या साठा करुन विक्री करताना दिसुन आला त्यावेळी आमची व पंचाची खात्री झाल्याने वरील स्टाफच्या मदतीने सदर ठिकाणी दि.११/०१/२०२५ रोजी १२.४५ वा. अचानकपणे छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम मिळुन आला त्याला आम्ही आमचे सोबतचे पोलीस स्टाफ व दोन पंचांची ओळख करुन देवुन पोलीस कारवाईचा उद्देश सांगितला असता त्याने सहकार्य करण्याची संमती दर्शविल्याने सपोनि सचिन निकम यांनी त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव १) विकास धोंडाप्पा आकळे वय ३१ वर्षे धंदा- ड्रायव्हींग रा. चरवड वस्ती दत्त मंदीराजवळ, वडगाव बुद्रुक पुणे मुळ रा. डोंगरगाव ता मंगळवेढा जि सोलापुर सध्या रा. रिध्दी-सिध्दी बिल्डींग पार्कीग रुममध्ये, सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक पुणे .
सदर इसमाच्या ताब्यात मिळुन आलेल्या टाक्यांची पंचाची समक्ष पाहणी केली असता भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरातील एकुण ६१ टाक्या व एक टाटा कंपनीचा एसीई गोल्ड टेम्पो असा एकुण ४,०९,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं २३/२०२५ बी.एन.एस. कलम भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २८७,२८८,३ (५) सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३.७ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार साो पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सोो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, श्री अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. दिलीप दाईगडे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल, यांचे पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

