कोंढवा परिसरात तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन निघृण खून,


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- धारदार हत्याराने तरुणाच्या गळ्यावर, पोटावर सपासप वार करुन खून केल्याची खळबळजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवनेरी नगर येथील पारशी ग्राउंडवर उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

शहानवाज उर्फ बबलू सय्यद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहानवाज याचा भाऊ समीर मुनीर सय्यद (रा. ताहिर हाईट्स, फ्लॅट नं २०३, भागोदयानगर, पुणे) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी रात्री साडे आठ ते सोमवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोमवारी सकाळी कामावर जात असताना शितल पेट्रोल पंपाजवळ त्यांचा मित्र आसिफ शेख याने सांगितले की, त्यांचा भाऊ शहानवाज उर्फ बबलू याचा पारसी ग्राउंड येथे खून झाला आहे. फिर्यादी
यांनी तेथे जाऊन खात्री केली. आरोपीने फिर्याद यांच्या भावाच्या पोटावर आणि गळ्यावर धारदार हत्याराने सपासप वार करुन निर्घृण खून केला.

घटनेची माहिती मिळताच वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे , पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले , पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. कोंढवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

  • पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले करीत आहेत.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!