अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या कुकला कोंढवा पोलिसांनी केले अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर 

घरत कुक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग  केला आहे. याप्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल करुन अटक  केली आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत उंड्री येथे घटना आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली. यावरून रणजित कुमार दिनेश मंडल (रा. कडनगर, उंड्री) याच्यावर आयपीसी 354, 506, सह पोक्सो कलम 8, 10, 12 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंडल फिर्यादी यांच्या घरात कुक  म्हणून काम करतो. आरोपीने फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. तसेच बाबांना सांगितले तर तुला बघुन घेईन अशी धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत आईला सांगितले. पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील करीत आहेत


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!