अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह वाकड पोलीस ठाणेचे तपास पथकाकडून शिताफीने अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
वाकड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत बेकायदेशीर अग्नीशरखे व दारुगोळा बाळगणारे, खरेदीविक्री करणारे त्याद्वारे समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, तसेच श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आदेशीत केलेले आहे. त्यानुसार परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त, श्री. बापू बांगर, चाकड विभाग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या मुन्हेगारांवर कारवाई करिता विशेष मोहिम सुरु केली आहे.
श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी वाकड पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांना वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणा-यांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितले आहे.
वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोहवा. १९२४ वंद्र गिरे यांला त्यांचे बातमीदराकडून थेरमाव गावठाणाकडे जाणाऱ्या कमानीजवळ, थेरगाव, पुणे येथे एक इसम त्याचे जवळ बेकायदेशीर पिस्तुल बाळगून आहे अशी बातमी मिळाली होती, सदरची बातमी तपास पथकाचे पोउपनि, सचिन चव्हाण यांना दिल्यानंतर सदरची बातमी त्यांनी वपोनि, निवृत्ती कोल्हटकर यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांचेसह रातमीदाराने दिलेल्या बातमीनुसार थेरगाव गावठाण परिसरात सापळा लावून इसम नामे माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर सुबराव पवार, वय २३ वर्षे, रा. लिपर्स हॉटेलच्या मागे, पवारनगर, मल्ली नं. ०८, शेख यांचे खोलीत भाडयाने, थेरगाव, पुणे गुळ रा. वाटंगबरी, वा. सांगोला, जि. सोलापूर यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याचेकडे बेकायदेशीर देशी बनावटीचे “एक पिस्टल, एक जिवंत काडतुस” ५०,०००/- रुपये किंमतीचे मिळून आले. सदर घटनेबाबत वाकड पोलीस स्टेशन मु.रजि.नं. ३६४/२०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९७९ चे कलग ३,२७ गहाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली. गुन्ह्याचे पुढील तपसामध्ये सदरचे अग्निशख हे त्याने अजय सटवा म्हस्के, वय २५ वर्षे, रा. जय मल्हार कॉलनी नं. ०३, रुम नं. १०१, थेरगाव, पुणे याचेकडून पेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासही या गुल्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदरचे बेकायदेशिर पिस्टल त्यांनी कशासाठी आणलेले होते याबाबत अधिक तपास चालू आहे.
नमूद आरोपी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर सुबराव पवार याचेविरुख्थ्य १) सांगोला पो.स्टे. गु.र.नं. ८००/२०११ भादविक ३२४,४२७,५०६,५०४,३४
२) सांगोला पो.स्टे. मु.र.नं. ८६७/२०१३ भादचिक ३२७,३४१,३४२,१४३ इ. आर्म अॅक्ट ३.२७ मपोका क ३७(१) सह १38 तसेच आरोपी अजय सदवा म्हस्के याचेविरुश्द
१) वाकड पो.स्टे. मु.२.नं. ३२०/२०१९ भादविक १४३,१४४.१४८,१४९ आर्म अॅक्ट ४,२५ मपोका कलम ३७ (903)48 939
२) वाकड पो.स्टे. गु.र.नं. ७३४/२०१८ मादविक ३४१४३४,४४७,१४३,१४७,१४९ ३) कोतवाली, जि. अहमदनगर पो.स्टे. गु.र.नं. ७४०/२०१९ भादविक ३०७,३२३,३४१
असे गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे तपासामध्ये आढळून आले आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सरे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सारे, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. रविकिरण नाळे, पोउपनि, सचिन चव्हाण, पोउपनि.अनिरुद्ध सावर्डे , श्रेणी पोउपनि.बिभिषेन कानेटकर, श्रेणी पोउपनि बाबाजन इनामदार , सोफी. राजेंद्र काळे, पोलीस अंगलदार वंदू मिरे, संदिप गवारी, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, दिपक साचले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत मिलवीले, रामचंद्र तळपे, विनायक धार्ने, अजय फल्ले, सौदागर लागतुरे, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, रमेश खेडकर, ज्ञानदेव लेंडे यांनी केलेली असून पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे पोउपनि सचिन चव्हाण हे करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

