डॉ. साळवे यांना आंतरराष्ट्रीय पिसमेकर सन्मान. प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे यांना आंतरराष्ट्रीय पिसमेकर सन्मान प्राप्त झाला आहे
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- डॉ. साळवे यांना आंतरराष्ट्रीय पिसमेकर सन्मान. प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे यांना कोरिया देशातील आतंरराष्ट्रीय धार्मिक शांतता ॲकॅडमी (International Religious Peace Academy )या संस्थेचा आंतरराष्ट्रीय पिसमेकर सन्मान प्राप्त झाला आहे. डॉ. साळवे यांना सन्मानपत्र मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक शांतता, मैत्री, सुसंवाद, धार्मिक, सामाजिक एकता , सलोखा प्रस्तापित करणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय धार्मिक शांतता ॲकॅडमी या संस्थेने मार्च २०२४ मध्ये ऑनलाईन परिषद आयोजित केली होती. या आंतरराष्ट्रीय परिषदेस अनेक राष्ट्रातील धार्मिक नेते व अभ्यासक उपस्थित होते. या परिषदेस डॉ. साळवे उपस्थित होते.त्यांनी २१ वे शतकातील निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये चालू असणारे शितयुद्ध थांबविण्यासाठी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन,जैन, बौद्ध, पारसी, शिख आणि इतर धर्मातील मानवतावाद व सामाजिक कल्याण हा केंद्र बिंदू मानून माणसाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, विविध धार्मिक तत्त्वांनुसार जागतिक शांतता , सुसंवाद ,राष्ट्रीय एकात्मता ,सुसंवादयुक्त कुटुंब, शांतता मय संस्कृती निर्माण करणे, आजच्या काळात आवश्यक आहे. असे विचार डॉ. साळवे यांनी मांडले. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या( UN) तत्त्वानुसार जागतिक शांतता , व धार्मिक सुसंवाद, संस्कृती, निर्माण करणे , आपण एक आहोत, (We are one) या मुख्य हेतूने अनेक धार्मिक नेते,कार्यकर्ते व अभ्यासकांनी या आतंरराष्ट्रीय धार्मिक शांतता परिषदेत आपले विचार मांडले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

