दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकुण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण ०१ दुचाकी गाडी, ०१ ऑटो रिक्षा व ०१ चारचाकी गाडी जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे:- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा याकरीता विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार असे बारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि नं ३६५/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व चोरीस गेले दुचाकी गाडीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, म्हाडा कॉलनी २ नंबर पार्किंगच्या समोरील पत्र्याच्या आडबाजुस, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे असलेल्या मोकळया मैदानाजवळ चोरलेल्या सैंट्रो कारसह विधीसंर्धीत बालक थांबला असून सदरची चारचाकी सॅन्ट्रो कार ही चोरीची असलेबाबतची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन नमुद मुलाचे ताब्यात मिळुन आलेल्या चारचाकी सॅन्ट्रो कारचे आर.टी.ओ. नंबरवरुन माहिती काढली व गुन्हे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर ऑटो रिक्षाबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नं ३६५/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालकांसमक्ष आणखीन चौकशी करता त्याने ०१ दुचाकी गाडी व ०१ ऑटो रिक्षा असे चोरी केल्याचे सांगितल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकुण ०३ वाहने जप्त करुन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वरील नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन पुणे शहरचे एकुण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचे कडुन किं. रु १,४५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा १, श्री. गणेश इंगळे, व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, श्रेणी. पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस अमंलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

