गांजा विक्री करणा-या इसमास अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने केली अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

अमंली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०२/१०/२०२४ रोजी नवलखा बिल्डींगच्या समोर भवानी पेठ पुणे या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंलदार असे गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम हातामध्ये नायलॉनची पिशवी घेवुन संशयीत रित्या कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याचे दिसला. त्यांनतर सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव इसाक जैनुद्दीन शेख वय ५३ वर्षे, रा. चमडी गल्ली, भवानी पेठ पुणे. असे असल्याचे सांगितले त्यानंतर त्याची व त्याचे ताब्यातील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये एकुण २९,३१०/-कि.चा ऐवज त्यामध्ये १८,१६०/-रु.कि.चा ९०८ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, ११,१५०/-रोख रक्कम छोटया १५ प्लॅस्टीकच्या पारदर्शक पिशव्या असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द समर्थ पोलीस ठाणे गु.र.नं.२१२/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क),
२०(ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घोरपडे, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, विपुल गायकवाड, नुतन वारे व योगेश मोहिते यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!