सर्व सामान्यांना त्रास देणाऱ्या सराईताची ०१ वर्षासाठी कारागृहात रवानगी चंदननगर पोलीसांची कारवाई


विशाल धाकतोडे पुणे प्रतिनिधी 
चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा  पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे  :- चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवराणा पोलीस चौकीचे हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या सराईत गुन्हेगाराची ०१ वर्षासाठी बुलढाणा मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा येथे रवानगी करण्याचे आदेश श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दिले आहे.
आदिल इफ्तेकार सय्यद वय २४ वर्षे रा. सम्राट अशोक शेवटचा बसस्टॉप वडगावशेरी पुणे असे कारागृहात रवानगी केलेल्या सराईत आरोपीचे नाव असुन त्याचेवर आजपावेतो नागरीकांना / व्यापा-यांना टोळी बनवुन दमदाटी करणे, प्राणघातक हत्यार जवळ बाळगून गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, हत्यारा सह जबरी चोरी करणे, अग्नीशस्त्राचा वापर करुन सामान्य नागरीकांमध्ये दहशत करणे अशा प्रकारचे एकुण ०६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर सराईतावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ति व दृकश्राव्य कलाकृतीची विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ति (व्हिडीओ पायरेटस) यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम (एम.पी.डी.ए.) या कायद्यान्वये कारवाई करुन सदर इसमावर अंकुश ठेवण्या करीता आरोपी नामे आदिल इफ्तेकार सय्यद वय २४ वर्षे याचेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी चंदननगर पोलीस स्टेशनकडील प्रस्ताव मान्य करुन एम.पी.डी.ए. कायद्यान्वये इसम नाने आदिल इफ्तेकार सय्यद वय २४ वर्षे रा. सम्राट अशोक शेवटचा बसस्टॉप वडगावशेरी पुणे यास स्थानबद्ध आदेश काढले असुन सदर इसमास बुलढाणा मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा येथे ०१ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदर स्थानबध्दतेचा प्रस्ताव हा श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे साो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे साो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती सीमा ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अजय असवले, पोलीस अंमलदार शशिकांत गायकवाड, विनोद तांदळे, रामचंद्र गुरव, विश्वनाथ गोणे, प्रमोद घाडगे, बालाजी पांढरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाने यांनी केला आहे.
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत कोणी इसम सर्व सामान्य नागरीकांना धमकावित असेल अथवा दहशत पसरवित असले तर अशा इसमांची माहीती चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्रमांक ०२०-२७०१२३२१ यावर कळविण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे यांनी केले आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!