अपहरणाच्या गुन्ह्यात सुमारे २ वर्षापासुन फरार असलेला गुन्हेगार जेरबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि.२५/०२/२०२३ रोजी साई जिम धनकवडी पुणे येथे अल्पवयीन पिडीत मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन अपहरण केल्या बाबत विकास शांताराम पवार वय २४ वर्ष रा मु. पो. अंत्रोली ता वेल्हे जि. पुणे यांचेविरुध्द सहकारनगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ५६/२३ भादवि कलम ३७६,३६६,३६६ अ, पोक्सो ४,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात आरोपी विकास पवार हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०२ वर्षापासुन फरार होता त्यास पुणे शहर आयुक्तालयाने पाहिजे आरोपी म्हणुन घोषित केले होते.

दि.११/०४/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस ठाणे येथे हजर असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व प्रदिप रेणुसे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत २ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे विकास शांताराम पवार हा त्याच्या गावी अंत्रोली येथे घरी आला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांना कळविली असता त्यांनी लागलीच सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सहकारनगर तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन खात्री करून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव विकास शांताराम पवार वय २४ वर्ष रा मु.पो. अंत्रोली ता वेल्हे जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सहकारनगर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने व सदर आरोपी एम ओ बी लिस्टमधील अ क्र. ४१८ व सहकारनगर पोलीस स्टशने कडील पाहिजे आरोपी लिस्ट मध्ये अ. क्र. ९५ अन्वये पाहिजे आरोपी असल्याने नमुद आरोपीस अटक करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील (अतिरीक्त कार्यभार), मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशनचे श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, प्रदिप रेणुसे, महेश मंडलिक, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, अमित पदमाळे, योगेश ढोले, महेश भगत, खंडु शिंदे, आकाश किर्तीकर, मानसिंग जाधव यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!