प्रविण सिद्राम मडीखांबे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ११ साथीदार यांचेविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे जिल्हा

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकाळभार पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पेट्रोल डिझेल चोरीचे अनुषंगाने मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर यांचे आदेशान्वये दिनांक १०/०९/२०२४ रोजी सहा. पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर, राजु महानोर, पो. अमंलदार ढमढेरे, शिवाजी जाधव असे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध करणचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, व पो. अमंलदार ढमढेरे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एच.पी.सी.एल व आय.ओ.सी.एल. कपंनी कदमवाकवस्ती ता. हवेली येथुन पेट्रोल व डिझेल भरुन टँकर पेट्रोल पंपाकडे जात असतात त्यावेळी त्यांना एच.पी.सी.एल व आय.ओ.सी.एल. कंपनी कडुन प्रवास करण्याचा मार्ग, वेळ नियोजित केलेली असते. तसेच सदर टँकर मधुन ते टँकर कंपनीच्या बाहेर गेल्या नंतर इंधन बाहेर काढता येवु नये या करीता टँकरला कंपनीचे लॉक करुन कंपनीचे बाहेर पाठविले जाते. असे असताना, मौजे कुंजीरवाडी थेऊर फाट्याजवळ ता. हवेली जि. पुणे येथील पुणे सोलापुर असा दुतर्फा वाहना-या महामार्गाचे दक्षिणेस श्री. तुकाराम धुमाळ यांचे घराचे पाठीमागे रिकाम्या जागेतील पत्र्याच्या शेडजवळ टँकर घेवुन जावुन त्यामधुन पेट्रोल डिझेल या ज्वलनशील इंधन बॅरेल मध्ये काढत आहे अशी मजकुराची खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच मा. सहा. पो. आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अश्विनी राख, व वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर श्री. राजेंद्र करणकोट यांना कळविले असता, त्यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडील तपास पथक चे पोलीस उप निरीक्षक अमोल घोडके, पोलिस अमंलदार वणवे, धुमाळ, विर, पाटील यांना छापा कारवाईचा आशय समजाऊन सांगुन कारवाई करण्याचे आदेशित केले.

Advertisement

सदर आदेशान्वये नमुद ठिकाणी छापा १५/१० वा.चे दरम्यान छापा टाकला असता, सदर ठिकाणी आय.ओ.सि.एल व एच.पी.सि.एल असे एकुण ०३ इंधन टँकर, त्या टॅकर मधुन इलेक्ट्रिक मोटारीचे साहाय्याने डिझेल बॅरेल मध्ये काढत असताना मिळुन आले. सदर छापा कारवाईमध्ये एकुण १,६२० लिटर डिझेल मिळुन आल्याने जप्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर पुढिल कायदेशिर कारवाई करीता आय.ओ.सि.एल. कंपनीचे अधिकारी व परिमंडळाचे पुरवठा अधिकारी यांना पत्रव्यवहार करुन समक्ष बोलाऊन घेतले. सदर ठिकाणी मा. सहा.पो.आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अश्विनी राख, व वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर श्री. राजेंद्र करणकोट यांनी तात्काळ भेट दिली. सदर घटने बाबत लोणीकाळभोर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.४४०/२०२४ बी.एन.एस. कलम १११,११२,३०३ (२),६१ (२),३१६ (३),२८७,२८८ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ३,४,५,६ सह अत्यावश्यक वस्तु अधि. कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी नामे १) शुभम सुशील भगत वय २३ वर्षे, रा. बोरकरवस्ती. थेऊर फाटा, ता. हवेली जि. पुणे २) तृशांत राजेंद्र सुंभे वय ३१ वर्षे रा. बैंक ऑफ बडोदाजवळ, थेऊर फाटा ता. हवेली जि.पुणे ३) रवी छोटेलाल केवट वय २५ वर्षे रा. बोरकरवस्ती, माळीमळा ता. हवेली जि. पुणे, ४) विशाल सुरेश गोसावी वय ३० वर्षे रा. वाणीमळा थेऊर फाटा ता. हवेली जि.पुणे ५) कृष्णा ऊर्फ किरण हरीभाऊ आंबेकर वय ३१ वर्षे रा. कदमावाकवस्ती ता. हवेली जि. पुणे ६) रोहीतकुमार छेदु लाल वय २५ वर्ष रा. बोरकरवस्ती माळीमळा ता. हवेली जि. पुणे, ७) अभिामान ऊर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ वय ३५ रा. पांढरी रोड, कन्याशाळेच्या मागे, लोणी काळभोर, पुणे ८) पांडुरंग निळकंठ नकाते वय ४२ वर्षे रा. माळीमळा, लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे ९) आकाश सुखदेव घोडके वय २४ वर्ष रा. हनुमाननगर, कोथरुड, पुणे १०) तेजस तुकाराम वाघमारे वय २३ वर्षे रा.न्यु शांतीनगर, श्रावणधारा वसाहत, कोथरुड, पुणे यांना दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. तसेच ११) टँकर मालक १२) प्रविण सिद्राम मडीखांबे रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे (टोळी प्रमुख) हे दोन पाहीजे आरोपी आहेत.

नमुद पाहिजे आरोपी प्रविण सिद्राम मडीखांबे रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे (टोळी प्रमुख) हा लोणीकाळभोर पोलीस स्टेशन अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, त्याने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. सदर टोळीने मागील १७ वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले आहेत. गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणेकामी लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. राजेंद्र करणकोट यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परि-५, पुणे शहर श्री. आर. राजा यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील यांना प्रस्ताव सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन लोणीकाळभोर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.४४०/२०२४ बी.एन.एस. कलम १११,११२,३०३ (२),६१ (२), ३१६ (३),२८७,२८८ स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ३,४,५,६ सह अत्यावश्यक वस्तु अधि. कलम ३,७ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२),३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पो. आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अश्विनी राख ह्या करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रार्देशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री. आर. राजा, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अश्विनी राख, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पो.स्टे. श्री. राजेंद्र करणकोट, सहा. पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन श्री. राजु महानोर, पोलीस उप निरीक्षक लोणी काळभोर पो.स्टे. अमोल घोडके, पोलिस अमंलदार रामहरी वणवे, मंगेश नानापुरे, मल्हार ढमढेरे, शिवाजी जाधव, संदीप धुमाळ, बाजीराव विर, योगेश पाटील यांचे पथकाने केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!