बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणा-या ०२ युवकाना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन १,०८,८००/- किमतीचा नायलॉन मांजा मुंढवा पोलीसांकडुन जप्त


अजिद इनामदार उपसंपादक
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- याबाबत सविस्तर द्रुत्त असे की, दिनांक १९/११/२०२५ रोजी दुपारी १२/०० वा चे सुमारास मुंढवा पोलीस स्टेशन कडील पोहवा शिवाजी जाधव, पोअं योगेश राऊत यांने त्याचे बातमीदारमार्फत बातमी मिळली की, हडपसर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दोन इसम नायलॉन मांजा त्याचे ओळखीचे लोकाना विक्री करण्यासाठी येणार असुन, सदर बातमीचे अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवुन सदर ठिकाणी तपास पथकातील स्टाफच्या मदतीने छापा कार्यवाही केली असता सदर वेळी इसम नामे १) आयुष राहुल शिदे वय २० वर्षे राह- ससाणे नगर अरीहंत रेसीडेन्सी, शिदेनिवास, हडपसर, पुणे २) यशराज विजय दिवेकर वय-२० वर्षे राह हिगणे मळा, भैरवनाथ मंदीराजवळ, हडपसर, पुणे यांचे ताब्यातुन १,०८,८००/- रु.कि.चे, मोनोफिल गोल्ड कंपनीचे नायलॉन मांज्याचे रिल असा मुदेमाल मिळून आल्याने तो गुन्हयाचे पुरावेकामी ताब्यात घेवुन वरील दोन्ही आरोपीविरुध्द मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३१३/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम २२३, ३(५) व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम ५ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५. श्री. राजकुमार शिदे, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती. अनुराधा उद्द्मले यांचे अधिपत्याखाली, मुंढवा पोलीस स्टेशन कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोहवा शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, राहुल मोरे, योगेश गायकवाड पोलीस अंमलदार योगेश राऊत, रुपेश तोडेकर, स्वप्नील रासकर यांचे पथकाने केली

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!