अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ! वाघोली भागात ११,१०,०००/- रु किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, तसेच इतर ऎवज जप्त केला.
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२९/११/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, व स्टाफ असे वाघोली पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप देवकाते यांना मिळालेले बातमीवरुन मंथन कॉम्प्लेक्स वाघोली रोड पुणे येथे इसम नामे लेखाराम धर्मराज चौधरी, वय २७ वर्षे, रा. चिरायु हॉस्पीटलचे बिल्डींग मागे केसनंद वाघोली रोड, ता. हवेली जि.पुणे मुळगाव गाव नारवा तहसील जिल्हा. जोधपुर राज्य राज्यस्थान यांच्या ताब्यात एकुण ११,१०,०००/- रु.कि.चा ५१ ग्रॅम ५० मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा व्यावसायिक स्वरुपात (Commercil Quantity) मध्ये अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द वाघोली पोस्टे गु.र.नं. /२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरु आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, श्री.राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार, संदिप जाधव, दत्तात्रय खरपुडे, पृथ्वीराज पांडुळे, संदिप देवकाते, देविदास वांढरे, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

