महिलांचे दागिने हिसकावणारे दोन गुन्हेगार जेरबंद करुन ५,३०,०००/- किंमतीचे ७ तोळे सोने व एक मोपेड गाडी जप्त करून चैन चोरीचे २ गुन्हे उघड


पंकेश जाधव संपादक 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१४/०१/२०२५ रोजी दुपारी १३/०० वा.चे सुमारास फिर्यादी त्रिमुर्ती चौकाकडुन गुलाबनगर कडे जाणारे रोडवर गोकुळ बंगल्या समोरील सार्वजनीक रोडवर रस्ता ओलांडत असताना एका मोपेड दुचाकी गाडीवरून दोन अनोळखी इसमापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले. त्या बाबत अज्ञात इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे (जुना कायदा भादवि कलम ३९२,३४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

दि.१८/०१/२०२५ रोजी दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सदर आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारे दोन्ही इसम हे ईवॉन आयटी पार्क खराडी पुणे येथील हनी स्मोकर पानटपरीचे समोर थांबलेले आहेत. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचे दोन इसम सदर ठिकाणी उभे राहुन सिगरेट ओढत थांबलेले दिसले. त्यांना संशय येताच ते तेथुन पळून जावु लागल्याने त्यांना सोबतचे स्टाफचे मदतीने थोड्याच अंतरावर पकडुन ताब्यात घेवुन त्यांची नावे पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) रितेश अंबादास जाधव वय २६ वर्षे रा. प्रतीक नगर संघर्ष चौक चंदननगर पुणे. मुळ रा.फ्री कॉलनी गल्ली नंबर ६, सोलापुर २) तरूण बलराम झा वय २५ वर्षे रा. पठारे ठुबेनगर बालाजी हॉस्पीटल जवळ खराडी बायपास पुणे मुळ रा. चनोर गाव मणिगची दरभंगा पटणा राज्य बिहार असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता मी व माझा साथीदार असे आम्ही मोपेड दुचाकी गाडीवरून धनकवडी भागात फिरत असताना एक वयस्कर महिला रस्त्याने चालत होती त्या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून आम्ही तेथुन पळुन गेलो. सदर गुन्हाची कबुली दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०९ (४),३ (५) हा गुन्हा उघडकीस आला असुन त्यांचे कडे अधिक तपास करता त्यांचे कडुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०४,३ (५) प्रमाणे उघडकीस आणण्यात आला आहे. सदर आरोपींन कडुन एकुण २ चैन चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले असुन एकुण ५,३०,०००/- रूपये किंमतीचे ७ तोळे सोने व एक मोपेड गाडी असा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील , मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, सागर सुतकर, किरण कांबळे, बजरंग पवार, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, खंडु शिंदे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!