कोंढवा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी ! अनोळखी इसमांकडुन फायरींग झाल्याचा खोटा बनाव करणा-यांचा कोंढवा पोलीसांनी माग काढून केला पर्दाफाश व आरोपीस केले जेरबंद.
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १९/०१/२०२५ रोजी कोंढवा पोलीस ठाणे येथे माहीती मिळाली की, आंबेगाव पोलीस ठाणे हद्दीत सिल्व्हर बिर्च रुग्णालय नन्हे या ठिकाणी प्रदिप सावंत नावाच्या गुंडाच्या उजव्या दंडावर गोळी लागुन जखमी झआला आहे.
नमुद उपचार करणाऱ्या गुंडाकडे कसोशीने चौकशी केली असता, सुरवातीस त्याने खोटी माहीती देवुन पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला होता. कसुन चौकशीत तो व त्याचा मित्र अभिलेखा वरील गुन्हेगार अनिल चव्हाण याने आणलेला बेकायदेशीर गावठी पिस्तुल हाताळत असताना गोळी सुटुन जखमी झाल्याचे समजले म्हणुन कोंढवा पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ४८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५ (ब) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), २७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद गुन्ह्यातील आरोपी अनिल रमेश चव्हाण, वय २४ वर्षे, रा. स. नं. ६५८, आंबिकानगर, निअर जगताप डेअरीजवळ, अप्पर कोंढवा रोड, पुणे ३७ हा पळुन गेला असल्याने त्याचा तपास पथकाच्या मदतीने त्याच्या लपण्याच्या ठिकाणी शोध घेण्यात आला. व त्यास शिताफीने गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासांत ताब्यात घेवुन त्यानी नमुद गुन्ह्यात वापरलेले गावठ बनावटीचे पिस्तुल हस्तगत करण्यात आले.
नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त साो., मा. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त साो., श्री रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त साो., पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो., परिमंडळ-५, डॉ, श्री राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त साो., वानवडी विभाग, श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अब्दुल रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सुरज बेंद्रे, यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, अमोल हिरवे, पोलीस अंमलदार सुरज शुक्ला पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, सागर भोसले, सुजित मदन यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

