डेक्कन परिसरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार पोलीसांच्या ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– डेक्कन पोलीस ठाणे हददीत भांडारकर रोड येथील एका बंगल्यातील कुटुंब हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असता बंगल्यामध्ये बाथरुमचे खिडक्या उचकटुन त्यामध्ये घरात प्रवेश करुन घरातील मौल्यवान व किंमती वस्तु चोरुन नेले बाबत डेक्कन पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २०९/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१(३),३३१ (४), ३०५ (अ) अन्वये दि.१४/१२/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्हयात डेक्कन पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असता प्राप्त असलेल्या तांत्रिक माहितीवरुन घरफोडी करणारी व्यक्ती ही जालना जिल्हयातील असले बाबत माहिती मिळाल्याने डेक्कन पोलीस ठाणे कडील तपास पथक जालना जिल्हा येथे जावुन गुन्हयाच्या अनुषंगाने संशयीत इसम नामे गणेश प्रकाश आव्हाड, वय २० वर्षे, रा. शासकीय हॉस्पीटल समोर, घनसांगवी, जालना याच्याकडे गुन्हयाच्या अनुशंगाने तपास करता सदरचा गुन्हा हा त्याने त्याची आई व मावशी यांच्या सह केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास डेक्कन पोलीस ठाणे येथे आणुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे त्याच्याकडुन चोरीस गेले मोल्यवान वस्तु हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संदिपसिंह गिल्ल मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे श्री. साईनाथ ठोंबरे, डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री. प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक महेश भोसले, अजय भोसले. दत्तात्रय सावंत, सहा. पो. फौजदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, मपोअं धनश्री सुपेकर, पोलीस अंमलदार गभाले, महेश शिरसाठ, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, रोहित मिरजे यांचे पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

