धडक कारवाई करून दोन दिवसात दोन गुन्ह्यात ०२ महागड्या चारचाकी वाहनांसह एकूण १९,३७,७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री. डॉ. विजय सूर्यवंशी सो, मा. संचालक (अं.व.द.) श्री. प्रसाद सुर्वे सो. यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री. सागर धोमकर सो, अधीक्षक श्री. चरणसिंग बी. राजपुत, उपअधीक्षक श्री. उत्तमराव शिंदे, श्री. सुजित पाटील, श्री. गणेश कसरे, श्री. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, पुणे या पथकाने दि. २२/०१/२०२५ व दि. २३/०१/२०२५ या दोन दिवसात महागड्या चारचाकी वाहनात ब्रँडेड विदेशी दारूच्या बाटल्यात बनावट विदेशी दारू भरून विक्री करणाऱ्यांवर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभागाने धडक कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार महागड्या चारचाकी गाड्या निर्जन स्थळी उभ्या करून बनावट विदेशी दारू ब्रँडेड विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यात भरून नकली बुचे लावून सीलबंद करून विक्री करण्याचा उद्योग सुरु आहे. अशा प्रकारचे बनावट मद्यप्राशन केल्याने मानवी जीवनास धोका उत्पन्न होतो. तसेच शासनाचा महसुलदेखील मोठ्या प्रमाणात बुडतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुप्त बातमीच्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग या पथकाने दि. २२/०१/२०२५ व दि. २३/०१/२०२५ रोजी अनुक्रमे राजेगाव तसेच खडकी, ता. दौंड भागात सापळा रचून दोन गुन्हे उघडकीस आणले. या दोन्ही कारवायांत आतापर्यंत एकूण ०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कारवायांत दोन महागडी चारचाकी वाहने, बनावट विदेशी दारू, बनावट झाकणे यासह एकूण १९,३७,७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाईत निरीक्षक श्री. विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक श्री. प्रदीप झुंजरुक, श्री. दिनेश ठाकूर, श्री. मयूर गाडे, जवान संकेत वाजे, शुभम भोईटे, अशोक पाटील, प्रविण सूर्यवंशी, सौरभ देवकर, जवान-नि-वाहन चालक केशव वामने यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक श्री. विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक श्री. प्रदीप झुंजरुक हे करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!