विश्रामबाग पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी ! दोन पिस्तुल व एक काडतुस जवळ बाळगणारा आरोपी जेरबंद


फयाज शेख पुणे प्रतिनिधी
विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे  :- दि. २३/१०/२०२५ विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार आशिष खरात व अनिस शेख यांना मिळाले गोपनीय बातमी वरुन राजेंद्रनगर भाग विश्राबाग पुणे येथील सार्वजनिक रोडच्या कडे इसम नामे मयुर सचिन भोसले, वय २० वर्षे, धंदा काही नाही, रा. पापळ वस्ती, गणपत नगर बिबवेवाडी, पुणे यास विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात अंदाजे १,००,२००/-रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल व एक काडतुस मिळुन आल्याने त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गु.र. नंबर २९०/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३. २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्री प्रदिप कसबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच राजेश उसगावकर सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अमोल भासेले, जाकीर मणियार, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, अनिस शेख, नितीन बाबर, सागर मोरे, शिवा गायकवाड व राहुल माळी यांनी केलेली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!