धुळे जिल्हा कारागृह वर्ग-1येथे श्री.यु.टी. पवार कारागृहउपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांच्या हस्ते उद्घाटन….


महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन :- आज दिनांक 12/03/2024 रोजी धुळे जिल्हा कारागृह वर्ग-1 येथे सानेगुरुजी उपहारगृह, इखीकाम विभाग, धोबीकाम विभाग, दुचाकी वॉशिंग सेंटर, अगरबत्ती विभाग, केशकर्तनालय विभाग, लोहारकाम विभाग, बेकरी विभाग, शिवणकाम विभाग इ. कारखाने तसेच ओपन जिम चे उद्घाटन सन्मा. श्री.यु.टी. पवार कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिक यांचे शुभहस्ते व मा. श्री. अभिनव गोयल, जिल्हाधिकारी, धुळे, मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे मा. श्री. संदीप स्वामी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे श्रीमती ममता हटकर, जिल्हा नियोजन अधिकारी, धुळे व कारागृह अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थितीत पार पडला.

या समारंभावेळी सन्मा.श्री.यु.टी. पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिक यांनी जिल्हा नियोजन समिती, धुळे यांचेमार्फत कारागृहातील कारखान्याचे साहित्य खरेदी करण्याकरीता निधी उपलब्ध करुन दिल्याने मा. श्री. अभिनव गोयल, जिल्हाधिकारी, धुळे यांचे आभार माणून बंदयांना मार्गदर्शन करतांना कारागृहात सुरु होणा-या उदयोगामुळे बंदयावर नैतिक प्रभाव पडुन बंदयामध्ये सामाजिक अंतर कमी होणार आहे व त्यांचेमध्ये काम करण्याची वृत्ती वाढणार आहे. कारागृह उदयोग माध्यम हे बंदी सुधारणा केंद्र होऊ शकते याकरीता कारागृहात आलेला प्रत्येक बंदी हा बाहेर पडतांना योग्य रितीने समाजाशी समरस होऊन जबाबदारीने व समाजमान्य मार्गाने स्वतःचे सामाजिक स्थान मिळविण्यास पात्र ठरावा आणि त्याकरीता कारागृहात असतांना त्यांचेवर योग्य संस्कार व्हावे, तसेच इतर बंदयासमवेत राहून काम करत शिक्षा भोगल्याने त्यांचेमध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल हा दृष्टीकोन समोर ठेवला आहे. कारागृहाचा नवीन चेहरा समाजा पुढे आणण्याकरीता प्रत्येक कैदयाचा पूर्व इतिहास व व्यक्तीमत्व लक्षात घेवुन वेगवेगळे उपाययोजना करणे आवश्यक होते याकरीता बंदयामध्ये सुधारणा व पुर्नवसन सुलभ होऊन ते स्वावलंबी होऊन त्यांचे हित कशात आहे याची जाणीव बंदयांना होऊन समाजात त्यांना प्रतिष्ठेने जगता यावे याकरीता त्यांना कारागृहात काम मिळावे व कामाचा मोबदला मिळुन त्यातुन दैनंदिन खर्च, वकीलांची फी व अडीअडचणीच्या काळात कुटुंबियांना ते पैसे पाठवून बंदी सदवर्तन करेल अशी अपेक्षा आहे असे सांगितले, तसेच गुन्हेगाराचा संसर्ग नवोदित गुन्हेगारांना होणार नाही हा हेतु साध्य होईल. त्यामुळे कारागृहात सुरु होणा-या उदयोगामुळे बंदयांना रोजगार उपलब्ध होऊन बंदयामध्ये सुधारणा व पुर्नवसन होणार असून बंदी सुधारण्याकरीता सदरचा हा प्रयोग यशस्वी ठरणार आहे. तसेच कारागृहातील वस्तु दर्जेदार असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना माफक दरात व उत्तम प्रतिच्या वस्तु व सेवा सहज उपलब्ध होणार आहे. सदर उदयोगामुळे धुळे जिल्हा कारागृहातील उदयोगांना चालना भेटणार असुन शासकीय निधीत मोठया प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Advertisement

मा.श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यकाळात कारागृह उदयोग, कारागृह शेती तसेच कारागृहातील बंदयाकरीता ऑनलाईन मुलाखत नोंदणी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नातेवाईक/वकील भेटी (ई-मुलाखत), स्मार्ट कॉर्ड फोन सुविधा, ई-लॅबब्ररी, किऑक्स मशीन, बायोमॅट्रीक थम सिस्टीम, अॅलन टेलिफोन सुविधा, अशा प्रकारचे विविध नवनवीन उपक्रम बंदयाकरीता सुरु केल्याबाबत सन्मा. श्री यु.टी. पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिक यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाकरीता सन्मा. श्री.यु.टी. पवार कारागृह उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग, नाशिक यांचे शुभहस्ते व मा. श्री. अभिनव गोयल, जिल्हाधिकारी, धुळे, मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे मा. श्री. संदीप स्वामी। सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे श्रीमती ममता हटकर, जिल्हा नियोजन अधिकारी, धुळे, मा. श्री गिरीष जाधव, जिल्हा परिविक्षा अधिकारी, धुळे, मा. श्री विल्सन रॉड्रीक्स प्राचार्य सेटं अँथनी हायस्कुल, धुळे, श्रीमती. शेख मॅडम, जनशिक्षण संस्था, धुळे तसेच कारागृहातील इतर अधिकारी/कर्मचारी व खुले कारागृहातील बंदीबांधव उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!