आळेफाटा, नारायणगाव परिसरातील मालवाहतुक वाहनांच्या बॅटरी चोरी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद,
पंकेश जाधव संपादक 7020794626
स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- साडे चार लाख रुपये किंमतीच्या २८ बॅटरीसह चारचाकी वाहन केले हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नारायणगाव पोलीस स्टेशन व आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत मालवाहतूक करणारी वाहने रात्रीचे वेळी पार्क केलेनंतर त्या वाहनांच्या बॅटरी चोरी होण्याचे गुन्हे अचानक नवीन वर्षाच्या सुरुवातीस वाढले होते.
सदर घटनांमुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक त्रस्त झाले होते. सदर प्रकरणाचे अनुषंगाने दाखल गुन्हयांचा तपास समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, यांनी आदेशीत केले होते.
बॅटरी चोरीचे गुन्हयांचे अनुषंगाने स्था.गु.शा.चे पो.नि. अविनाश शिळीमकर यांनी सदर गुन्हयांचा आढावा घेवनू एक तपास पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने गुन्हयाची वेळ व ठिकाण याची माहिती घेत सदरचा गुन्हा करणारा व्यक्ती हा एकच असून गुन्हयाचे ठिकाणी एक सिल्वर रंगाची अल्टो कार चारचाकी वाहन येत आहे व बॅटरी चोरी करून त्याच वाहनातून बॅटरी नेली जात आहे अशी माहिती तपासात पुढे आली. सदर प्रकरणाचे अनुषंगाने पथकाने तपास चालू केला असता सदर गुन्हयातील वाहन हे इसम नामे केतन रोहीदास विधाटे रा. धालेवाडी ता. जुन्नर जि. पुणे हा वापरत आहे अशी माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्याचा शोध घेत असताना तो दि. १५/०१/२०२५ रोजी नारायणगाव परिसरातील कोल्हेवाडी रोड येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा लावून त्यास कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव केतन रोहीदास विधाटे वय २४ वर्षे रा. धालेवाडी ता. जुन्नर जि. पुणे असे असल्याचे सांगून त्याचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता, त्याने एकूण ७ गुन्हे केल्याचे सांगितले व गुन्हयातील चोरी केलेल्या २८ बॅटरी त्याचेकडील कारमध्ये मिळून आल्या. गुन्हा करताना वापरलेली चारचाकी अल्टो कार व २८ बॅटरी असा एकूण ४,४४,४००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
आरोपी केतन रोहिदास विधाटे वय २४ वर्षे रा. धालेवाडी ता. जुन्नर जि. पुणे यास मुद्देमालासह पुढील तपास कामी नारायणगाव पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास नारायणगाव पो. स्टे. व स्था.गु.शा.चे वतीने करणेत येत असून आरोपी कडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे साो. पुणे विभाग, श्री. रविंद्र चौधर साो. उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पो स्टे चे पो नि दिनेश तायडे, नारायणगाव पो स्टे चे सपोनि महादेव शेलार, स्था.गु.शा.चे अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, निलेश सुपेकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

