कोंढवा पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी ! सांगवी पोलीस स्टेशन कडील जबरी चोरी, मोक्का मधील दोन महिने फरार आरोपीस कोंढवा पोलिसांनी केले जे्रबंद


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

Advertisement

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि. 14/08/2025 रोजी सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोहवा. चव्हाण, पोहवा मेमाणे, पोअंम. बनसुडे, पोअंम. बनकर, पोअंम.मदन, पोअंम. शुक्ला, पोअंम. हिरवे असे हद्दीत 15 ऑगस्ट च्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोहवा सतीश चव्हाण व पोअंम संतोष बनसुडे यांना बातमी मिळाली की सांगवी पोलीस स्टेशन गु .र.क्र – 186/2025 BNS 309(5), 324(4), 352, 351(2), 111, 3(5), क्रिमिनल लॉ अमेडमेंट कलम 3 व 7 या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम *(मोक्का)* मधील दोन महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपी नामे अनिकेत आकाश उरणकर वय 26, वर्षे, रा – आईमाता मंदिरच्या मागे, गंगाधाम चौक, पुणे.

सदरचा आरोपी हा शिवनेरीनगर, कोंढवा पुणे येथे आलेला असल्याची गुप्त माहिती मिळताच वरील स्टाफ च्या मदतीने सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला आहे. तसेच नमूद आरोपीस पुढील कारवाई करिता सांगवी पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्याची कार्यवाही केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!