कारागृहातील बंद्यांकरिता ई-मुलाखत / व्हिडीओ कॉन्फरन्सिन्ग सुविधा
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पोलीस विभाग, न्यायपालिका, कारागृह विभाग, अभियोग संचालनालय व न्यायचेद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय हे भारतातील फोल्दारी न्याय प्रणालीचे पाच प्रमुख स्तंभ आहेत, भारतीय फौजदारी न्याय प्रणालीच्या गा पाच सांभांमध्ये माहितीचे हस्तांतरण आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत सुलभरित्या करता यावे वाकरीता मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीच्या शिफारशीनुसार मा.केंद्रीय गृह विभागाच्या अधिनस्त NE (National Informatics Centre) द्वारे ICIS (Inter-operable Criminal Justice System) T Platform तयार करण्यात आला असून फौजदारी न्याय प्रणालीचे पाचही स्तंभ एकाच छत्राखाली स्वतंत्र वैयक्तिक Application Suite ने एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. त्याअंतर्गत पोलीस विभागासाठी CCTNS, न्यायपालिकेसाठी Courts, कारागृहांसाठी ePrisous, अभियोग संचालनालयासाठी eProsecution व न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांसाठी eForensics असे स्वतंत्र परंतु एकमेकांशी संलग्न असलेले Platonis तयार करण्यात आलेले आहेत.
कारागृह विभागासाठी असलेले ePrianna है Application Saite महाराष्ट्र कारागृह विभागाने अंगिकृत केले असून राज्यातील कारागृहांतील बंधांसंबंधीचे दैनदिन कामकान व बंद्यांना पुरविल्या माणान्या विविध सुविधा यांचे व्यवस्थापन है lisans (ICUS) द्वारे सुरू आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये बंदीस्त असलेल्या भारतीय व विदेशी बंद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकिलांशी संवाद साधण्यासाठी eMulakal सुविधा ePrisons (1015) प्रणालीद्वारे दिनांक 04 जुलै 2023 पासून सर्व कारागृहांत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुलाखत नाच नोदणीसाठी नातेवाईकांना खूप दूरवरून प्रवास करत येवून कारागृहाबाहेर तासन् तास वाट पाहत बसावे लागत असल्याने बंद्याच्या नातेवाईकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे. परंतु आता बंद्यांसोबत मुलाखत पेण्याकरीता बंद्यांचे नातेवाईक काही दिवस अगोदरच ePrisons (ICIS) प्रणालीद्वारे नोंदणी करतात व त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छित दिवशी व वेळी बंद्यांची मुलाखत घेता येते.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये विविध देशातील नागरिक विदेशी बंदी माणून दाखल असून त्यांचे परदेशातील मुले मूली व नातेवाईकाशी ई मुलाखत व्हीडीओ कॉन्फरसद्वारे विहीत अटीवर सदरील सुविधा लागू करण्यात आलेली आहे. मात्र सदरची सुविधा दहशतवादी कारवाया मधील बंदी व पाकिस्तानो बंदी पांना सुरक्षेच्या कारणास्तव देण्यात येत नाही, राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे ६०० पेक्षा अधिक विदेशी बंदी असून अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून किंवा वर्षापासून त्यांचा आपले कुटुंबिय, आई-वडील, मुले-मुली यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नव्हता, परंतु e-Mulakat सुचिया सुरू झाल्यामुळे विदेशी बंधाया त्यांच्या पुबियांशी संवाद होऊ लागला असून त्याच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत. अनेक वर्षानंतर आपल्या कुटुंबियांशी ई-मुलाखतीद्वारे संचार साधतांना विदेश चंद्यांच्या चेह-यावर समाधानाची भावना दिसून येत आहे.
दिनांक 01 जानेवारी २०२४ ते दिनांक 31 मार्च २०२४ या कालावधीमध्ये सुमारे 21.963 पुरुष व महिला बंद्यांनी Mulakat मुविधेचा लाभ घेतला आहे. सदर कालावधीमध्ये ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या बंद्यांमध्ये तळोना मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांची संख्या सर्वात जास्त म्हणने 3478 असून त्याखालोखाल ठाणे मध्यवर्ती कारागृह-3438, नागपूर मध्यवर्ती कारागृह-3425, मुंबई मध्यवर्ती कारागृह 1797, नाशिकरोड मध्यवती कारागृह- 1559, कल्याण जिल्हा कारागृह 1442, पेरवडा मध्यवती कारागृह 1228, इतक्या बंधांनो ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेतला आहे. राज्यातील उर्वरित कारागृहांमधील ई मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या बंद्यांची संख्या देखील लक्षणीय दिसून पोत असून दिवसेंदिवस त्यामध्ये वृध्दी होतांना दिसून येत आहे.
बंधांना e-Mulakat सुविधेचा लाभ देण्यासाठी मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनांक 22 मार्च २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित बेले असून त्यानुसार न्यायाधीन मंधाना महोन्यातून चार वेळा व शिक्षाधीन बंद्यांना दोन वेळा नातेवाईक, मित्र प वकीलांसोबत नियमांचे अधीन राहुन Mulakhat देण्यात येत आहे. बंद्यांना Mulakat सुविधा देण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचना सदर परिपत्रकात असून त्यानुसारच सदरची सुमिधा बंद्यांना पुरविण्यात येत व्यहे.
मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से.), अपर पोलीस महासंयालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी बंधांना सदरची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे जास्तीत जास्त बंद्याच्या नातेवाईकांचा Mulakhat सुविधा वापरण्याकडे कल दिसून येत आहे व त्यामुळे बंद्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी वेग्याच्या खर्चात देखील बचत झालेली आहे. सदरील सुविधेच्या अंमलबजावणीबाबत डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.). विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय), कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत असून सदरची सुविधा चांगल्या प्रकारे बंधांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
सदरील सुविधा लागू आल्याची माहिती बंद्यांच्या नातेवाईकांना मिळण्याकरीता सर्व कारागृहांच्या दर्शनी भागांमध्ये नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. परिणामी कंद्यांच्या नातेवाईकांना किडीओ कॉलींगद्वारे बंद्यांची भेट घेणे अधिक सुलभ झाल्यामुळे बंदी व नातेवाईकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे. ई-मुलाखतीस बंधांचे नातेवाईकांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केलेली असून सदरील बाब कारागृह विभागाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु असल्याचे सुतोवाच करणारी आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

