हांडेवाडी परिसरात घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील चोर जेरबंद वानवडी पो.स्टे. तपास पथकाची कारवाई


पंकेश जाधव संपादक 7020794626

वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे  :- दि.१९/०३/२०२४ रोजी रात्रौ ००/५० ते सकाळी ०६/०० वा. चे सुमारास फ्लॅट नं. डी ५०१, ईशा अॅम्पायर सोसायटी, चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे येथे फिर्यादी यांचे घरातून । लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, एक अॅपल कंपनीचा मोबाईल व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ८५,०००/- रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होतो. त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २१६/२०२४ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींगसाठी दोन पथके तयार केली होती. तपासादरम्यान सदर घरफोडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार १) अल्ताफ ऊर्फ एम सी स्टँड हमीद शेख, वय २० वर्षे, रा. ग.नं. १६, सय्यदनगर, हडपसर, पुणे, २) आलीम साहेब पटेल, वय १९ वर्षे, रा.ग.नं.१२. सय्यदनगर, हडपसर, पुणे यांनी केली असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाल्याने तात्काळ सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पतंगे साो यांना कळवून तपास पथक प्रभारी संतोष सोनवणे व स्टाफ रवाना झाले. मिळालेल्या माहितीचे आधारे चोरी करणारे वरील आरोपींना ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली.

Advertisement

वर नमूद अटक आरोपीत याचेकडे अधिक तपास करता गु.र.नं. २१६ / २०२४ भा.द.वि.कलम ४५७.३८० हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून गुन्हयात चोरी गेलेला लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, एक अॅपल कंपनीचा मोबाईल व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ८५,०००/- रु. कि. मुद्देमाल जप्त

करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर श्री आर राजा, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुत्तार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार हरीदास कदम, वानवडी पोस्टे पुणे. हे करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!