शेतकऱ्याचे कृषी पंप व इलेक्ट्रिक डीपी मधील कॉपर चोरी करणारी टोळी लोणीकंद पोलीसांनी केली गजाआड
पंकेश जाधव संपादक 7020794626
लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १०/०१/२०२५ रोजी मौजे न्हावी सांडस गावातील शेतक-यांनी शेतीला पाणी देण्यासाठी नदी पात्रालगत बसविलेले कृषी पंपाची तोडफोड करुन त्यामधील तांब्याच्या तारा चोरीस गेलेबबात शेतक-यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरुद्ध लोणीकंद पो स्टे, गुन्हा रजि क्र ३३/२०२५, भा.न्या.स. कलम ३०३(२), ३२४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपास अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र गोडसे व तपास पथक अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याचे तपासात दि १२/०१/२०२५ रोजी सपोनि गोडसे, पो हवा. कैलास साळंके, पो हवा. अजित फरांदे, हवा. सागर जगताप, पो शी मल्हारी सपुरे, पो.शी शुभम चिणके, पो शी सुधिर शिवले, यांनी गोपनीय बातमी आधारे केडगाव, ता. दौंड, जि. पुणे येथे यशस्वती सापळा लावुन रेकॉर्डवरील आरोपी नामे महेश लक्ष्मण धुमाळ, वय २९ वर्ष, रा. मु.पो. आंबेगाव, वेताळनगर, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे यास ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता त्याने वर नमुद गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच नमुद गुन्हा हा त्याचे साथीदार नामे १) सोमनाथ लक्ष्मण जाधव, वय २७ वर्ष, रा. मु.पो. आंबेगाव, वेताळनगर, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे २) तुषार संदिप काळे, वय २८ वर्ष, रा. मु.पो. आंबेगाव, वेताळनगर, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे ३) प्रथमेश बाळासाहेब जाधव, वय १८ वर्ष, रा. मु.पो. आंबेगाव, वेताळनगर, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे ४) शशिकांत शंकर कदम, वय २५ वर्ष, रा. के/ऑफ महेश धुमाळ, मु.पो. आंबेगाव, वेताळनगर, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे मुळपत्ता मु.पो. मुढाळे, ता. बारामती, जि. पुणे यांचे मदतीने केला असल्याचे सांगितल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करून ०४ दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली.
दिनांक-१५/०१/२०२५ रोजी पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल तांब्याच्या तारा (कॉपर), कि रु २७,५००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच सदर चोरीचा माल घेणारा भंगार विक्रेता मालखाऊ इसम नासिर अहमद खान, वय ३५ वर्षे रा. नाव्ही सांडस फाटा, नाव्ही सांडस ता हवेली जि पुणे यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे
तसेच आरोपीकडे केलेल्या कौशल्य पूर्ण तपासात आरोपींनी पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस, डोंगरगाव, बुर्केगाव, अष्टापूर, कोलवडी परीसरातील डीपी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यांचे कडून एकूण ४०५ किलो तांब्याचा तारा किमंत ४,२५,०००/- रुपये असे एकूण ०७ गुन्हे उघडकीस आले आहेत. नमुद गुन्हयाचा तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. हिमत जाधव साो, पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनवणे साो, सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सर्जेराव कुंभार साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार सागर जगताप, अजित फरांदे, कैलास साळुंके मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, चिंतामणी गवळी, किसन मांदळे सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

