मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर वाहन चोरी करणारा सराईत चोरटा पोलीसांच्या जाळ्यात
गणेश कांबळे पुणे प्रतिनिधी
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मुंढवा पोलीस ठाणेचे हद्दीत तपास पथकाचे अधिकारी आर.व्ही. महानोर व तपास पथक अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना ते फिरत फिरत लोणकर चौक, मुंढवा पुणे येथे आले असता पो. हवा. शिवाजी जाधव यांना एका दुचाकीवर असलेला इसम हा संशयास्पद वाटल्याने त्यास थांबवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव मिथुन सुगंध लोखंडे वय २२ वर्षे, रा.सर्वे नंबर १०३५, महात्मा गांधी सोसा सहकारनगर नंबर १, सध्या रा. मिरेकरवस्ती शंकरमठाजवळ हडपसर पुणे, असे सांगितले असता त्याचे ताब्यात असलेल्या गाडीबाबत चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास मुंढवा पोलीस स्टेशन येथे आणुन अधिक चौकशी करता सदर गाडी त्याने काही दिवसांपुर्वी पिगळेवस्ती घोरपडी येथुन चोरी केलेचे केल्याचे सांगीतले. त्याबाबत मुंढवा पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासला असता गुन्हा रजि. नंबर १२/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३(२) प्रमाणे दिनांक १३/०१/२०२५ रोजी दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचेकडे अधिक तपास केला असता पुणे शहर हद्दीतुन चार मो.सा.ची चोरी केल्याचे कबुल करुन त्याने सदरच्या मो.सा. काढुन दिल्याने त्या दाखल गुन्ह्याचे पुरावेकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदर आरोपीकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघड केले आहेत.
(१) ४०,०००/- रू.कि. हिरो कपंनीची ब्लॅक अॅण्ड ग्रे रंगाची स्प्लेंडर दुचाकी क्र. MH-12/QN/2147,
(मुंढवा पो.स्टे.गु.र.नंबर १२/२०२५ बी.एन.एस.३०३(०२) मधील) (२) २०,०००/- रू.कि.ची हिरो स्प्लेंडर प्रो क्र. MH-25/AE/6035 (कि.अं.)
(हडपसर पो.स्टे.गु.र.नंबर ५७/२०२५ बी.एन.एस. ३०३(०२) मधील)
(३) १०,०००/- रू. किं. ची होंडा डिओ क्रमांक MH-12/JJ/2422 (कि.अं.) (हडपसर पो.स्टे.गु.र.नंबर ३७/२०२५ बी.एन.एस.३०३ (०२) मधील)
(४) १०,०००/- रू.कि.ची हिरो पेंशन एक्स प्रो क्र. MH-12/NM/3724 (कि.अं.) (लष्कर पो.स्टे.गु.र.नंबर १७०/२०२४ बी.एन.एस. ३०३ (०२) मधील)
(५) ०५,०००/- रू. किं. ची हिरो पेंशन प्लस क्र.MH-12/EN/1440 (कि.अं.)
(स्वारगेट पो.स्टे.अ.द.पा.गु.र. नंबर ४०३/२०२४ बी.एन.एस.३०३ (०२) मधील)
सदरची कामगिरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त सारे, (पूर्व विभाग) पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ५ पुणे शहर, श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब निकम यांचे मार्गदर्शानाखाली तपासपथक प्रमुख आर.व्ही. महानोर पोलीस अंमलदार राजु कदम, शिवाजी जाधव, विनोद साळुंके, योगेश गायकवाड, राहुल धोत्रे, अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर, योगेश राऊत यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

