पॉक्सो कायद्याबाबत खडक पोलीस स्टेशन व मुस्कान संस्थेमार्फत जनजागृती कार्यक्रम..
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :– खडक पोलीस स्टेशन दामिनी पथक व फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन – मुस्कान मार्फत पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील शाळा, कॉलेज मध्ये मुलांशी सत्र घेत आहेत.
आपल्याला जर कोणी त्रास देत असेल, कोणी कोणत्याही प्रकारे अडचणीत आणत असेल तर न घाबरता थेट पालक, शिक्षकांना कल्पना द्यावी. आपल्यासाठी अनेक कायदे आहेत बालकांसाठी विशेष कायदे आहेत. त्यामुळे कोणालाही न घाबरता जर त्रास होत असेल तर प्रतिकार करा. पालकांना कल्पना द्या, पोलिसांना माहिती द्या. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श ओळख.
माननीय पोलीस निरीक्षक संपत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लहुजी वस्ताद साळवे प्राथमिक शाळा, उर्दू व मराठी माध्यम येथे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण या कायद्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यासाठी मुस्कान संस्थेचे समुपदेशक प्रमोद पाटील, पूजा कडू व शुभांगी घरबुडे यांनी मुलांना पपेट च्या माध्यमातून गोष्टी रुपात बालक म्हणजे कोण ? बालकांचे अधिकार, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, स्पर्श कोण व कुठे होऊ शकतात. त्यावेळी आपण काय करावे तसेच असे असुरक्षित स्पर्श होत असल्यास माहिती कोणाला द्यायची हे सांगण्यात आले. व मुस्कान संस्थेचे हेल्पलाईन नंबर 9689062202/912299784 नंबर देऊन बालकांच्या सुरक्षेसाठी असणारा पोक्सो कायदा या विषयी माहिती दिली.
खडक दामिनी मार्शल निवेदिता यादव यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन मुलांना पोलीस दीदी, पोलीस काका उपक्रमा बद्दल माहिती देऊन पोलीस हेल्पलाईन 1091,1098,व 112 बाबत माहिती दिली. सायबर क्राईम,मोबाईल इंटरनेट अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम व उपयोग, वाहतुकीचे नियम या बद्दल माहिती दिली, तसेच शाळा सुटल्यावर रिक्षा, पालक घ्यायला आल्याशिवाय कुणी ही परस्पर जाऊ नये या विषयी मुलांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. शाळेत मुलांना सोडायला येणारे व्हॅन व रिक्षा माहिती घेण्यात आली. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नसरील इनामदार व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

