रोकड चोरणारा आरोपी युनिट -०४ चे जाळयात


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- इसम नामे नितीन रमण कारंडे वय ४० वर्षे, रा. सुदर्शननगर, सृष्टी हॉटेल मागे, पिंपळे गुरव, पुणे यांनी दि. ३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी०६/०० वा. ते दि. ३१/१२/२०२३ रोजी ११/३० वा. चे सुमारास एसकेपी कॅम्पस बालेवाडी पुणे येथिल ज्ञानगसागर इन्स्टयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या ऑफिसमधील रोख रक्कम रु. ११,५०,००/- चोरी गेलेबाबत अज्ञात चोराविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९५३/२०२३ भा.द. वि. कलम ३८० प्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल होता.

दाखल गुन्हयाचा युनिट ०४, समांतर तपास करत असताना तांत्रीक विश्लेषणाद्वारे दाखल गुन्हयामध्ये आरोपी निष्पन्न करुन दि. ०५/०१/२०२४ रोजी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार सारस साळवर व पोलीस अंमलदार वैभव रणपिसे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत सदर गुन्हयातील आरोपी वाल्मिक पाटील हा संगमवाडी पार्किंग क्र. ३ येथे आला असून तो गावी जाण्याच्या तयारीत असलेबाबत बातमी मिळाली.

Advertisement

सदर बातमीच्या अनुषांगाने लागलीच गुन्हे शाखा, युनिट ४, पुणे शहर कडील पथकाने संगमवाडी पार्किंग क्र. ०३ येथे जावून शिताफिने वाल्मिक संजय पाटील वय ३१ वर्षे, रा. माळीवाडा, अमलेश्वरनगर, ता. अंमळनेर, जि. जळगांव यांस ताब्यात घेतले. त्याचे कब्जात एकुण रु. ८,४८,६५०/- एवढी रोख रक्कम मिळून आली. सदर रकमेबाबत आरोपीकडे कसुन तपास केला असता त्याने सदरची रक्कम एसकेपी कॅम्पस बालेवाडी पुणे येथिल ज्ञानगसागर इन्स्टयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या ऑफिसमधुन चोरल्याचे सांगुन गुन्हयाची कबुली दिली. दाखल गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील आरोपीस पुढील कारवाईकामी चतुः श्रृंगी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेशकुमार, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस हवालदार विठ्ठल वाव्हळ, पोलीस हवालदार पोलीस हवालदार सारस साळवी, पोलीस हवालदार प्रविण भालचिम, पोलीस अंमलदार वैभव रणपिसे, सहा. पोलीस फौजदार शितल शिंदे, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!