फायरींग मधील मोक्का गुन्हयातील १० महिन्यापासून फरार असलेला आरोपी जेरबंद वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाची कारवाई


पंकेश जाधव संपादक 7020794626

वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आगामी लोकसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने मा. वरिष्ठांनी जास्तीत जास्त मोका गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या. दि.०८/०४/२०२४ रोजी सुचने प्रमाणे तपास पथक स्टाफ मोकातील पाहिजे आरोपींचा शोध घेताना पोलीस हवालदार सर्फराज देशमुख यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि. वानवडी पो.स्टे. गुन्हा रजि.नं. २५८/२०२३ भा.दं. वि. कलम ३०७,१२० (ब), २१२,१०८,१०९,२०१, ३४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७. भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम ३ (१) (ii), ३(२).३(४) या गुन्हयातील पाहिजे आरोपी अक्षय नागनाथ कांबळे, रा. ससाणेनगर, लेन नंबर १५, हडपसर पुणे हा रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, रेल्वे अंडरबायपास जवळ, रामटेकडी, हडपसर पुणे येथे कोणाचीतरी वाट पहात थांबलेला असून त्याने काळे पिवळ्या रंगाचा टि शर्ट, काळ्या रंगाची जिन्सपॅन्ट परिधान असलेला, वय अंदाजे २५ ते ३० वर्षे, अंगाने सडपातळ, उभट चेहरा असलो आहे. वगैरे मजकूरची बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, वानवडी पो.स्टे. पुणे यांना कळविली असता त्यांनी बातमीचे ठिकाणी जावून नमूद आरोपीचा शोध घेवून तो मिळून आल्यास योग्य ती कारवाई करणेचे आदेशीत केल्याने तपास पथकातील पोलीस हवालदार सर्फराज देशमुख, हरिदास कदम, महेश गाढवे, पोलीस अंमलदार यतिन भोसले, गोपाल मदने, विष्णू सुतार स्टाफ रवाना झाले. मिळालेल्या माहितीचे आधारे वरील दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे अक्षय नागनाथ कांबळे यास शिताफिने ताब्यात घेवून त्यास अटक करण्यात आली.

Advertisement

अटक आरोपीचे नाव खालील प्रमाणे-

१) अक्षय नागनाथ कांबळे, वय २७ वर्षे, रा. ससाणेनगर, लेन नंबर १५, हडपसर पुणे

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर श्री आर राजा, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, यतिन भोसले, गोपाल मदने विष्णु सुतार, अमोल गायकवाड, संदिप साळवे, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!