अवैध गॅस रिफिलींग करणाऱ्या इसमांनवर मालमत्ता गुन्हे विरोधी पथककाडुन मोठा छापा, एकुण ८,३२,५००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत.


पंकेश जाधव संपादक 7020794626

मालमत्ता गुन्हे विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त साो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. संदीप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड व श्री. डॉ. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ, यांनी अधिकारी व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अवैध धदंयावर छापा टाकुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.

त्या प्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे अवैध धंदयावर कारवाई करणे असल्याने पिपंरी चिचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिग करत असताना पोलीस शिपाई २०५५ रासकर याना बातमी मिळाली की काही इसम गल्ली नं २, पवार वस्ती, कुदळवाडी, चिखली, पुणे. येथे पत्र्याच्या शेडमध्ये चार इसम घरगुती भरलेल्या सिलबंद गॅस सिलेंडर मधुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्यागॅस रिफिलिंग नोझलचे सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या लहान मोठ्या गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस रिफील करुन त्या विक्री करीत आहे. सदर ठिकाणी सपोफौ खांडे, पोलीस हवा १०७२ नितीन लोखंडे, पोलीस हवा १४५८ बनकर, पोशि २०५५ रासकर, पोशि २८६५ अमर कदम यांनी जावुन छापा टाकला असता इसम नामे १. शशिकांत शंकर भांगरे, वय ४३ वर्षे, रा साई कॉलणी, चिखली, पुणे २. सागर सुर्यकांत मिरगाजी, वय २६ वर्षे, रा. बालघरे वस्ती. चिखली, पुणे. ३. अमर महादेव साठे, वय २९ वर्षे, रा भिमशक्ती नगर, मोरे वस्ती, चिखली, पुणे. व ४. योगेश गंगाधर गुंडले, वय १९ वर्षे, रा जाधववाडी, चिखली, पुणे. हे भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधुन रिकाम्या गॅसच्या सिलेंडर मध्ये नोझलच्या सहाय्याने गॅस रिफिल करत असताना मिळुन आले.

सदर पत्र्याच्या शेडमध्ये काही अर्धवट भरलेले व रिकामे सिलेंडर तसेच गोडावुन मध्ये उभ्या असलेल्या दोन टॅम्पो मध्ये देखील अर्धवट भरलेले व रिकामे सिलेंडर असे एकुण १२६ गॅस सिलेंडर व ०२ टेम्पो असा एकुण ८,३२,५००/-रु किं चा मुद्देमाल पंचनाम्याने हस्तगत करण्यात आला आहे. अजय राजेंद्र जैन, रा चिखली, पुणे यांचे सांगणेवरुन गॅस रिफिलिंग करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर आरोपींन व पाहीजे आरोपी अजय जैन यांचे विरुध्द भा.न्या.सं. कलम २८७, २८८ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ अन्वये चिखली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करीता आरोपी व मुद्देमाल चिखली पोलीस ठाणे चे ताब्यात देण्यात आला आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. पिंपरी चिंचवड, मा. पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. श्री. वसंत परदेशी साो, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्री डॉ. विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहा पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, पोशि विनोद वीर, समीर रासकर, अमर कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!