दुचाकी चोराला भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या तीन लाख 90 हजाराच्या आठ दुचाकी हस्तगत.
पुणे ब्युरो चीफ डॅनियल ॲनथोनी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सराईत दुचाकी चोरट्याला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या चोरट्यांकडून ०३लाख ९०हजार किमतीच्या ०८चोरीच्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केले आहेत. १)सागर भाऊसाहेब शिंदे (वय३२,वर्ष रा.आंबेठाण गाव किरण नाणेकर ,यांची रूम चाकण .मूळ पत्ता सोनगाव सातरळ ,ता.राहुरी जि.अहिल्यानगर ,अहमदनगर )असे अटक केल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे ,तर त्याचा साथीदार योगेश बाळासाहेब इलै रा.चाकण मूळ पत्ता सोनगाव सातरळ,ता.राहुरी जि.अहिल्यानगर .याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे पुण्याचे तपास सुरू केला .तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे .व अंमलदार यांना मार्गदर्शन केले .तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे व अंमलदार यांनी दुचाकी चोरी घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले ,तसेच विविध ठिकाणी सापळे रचून दुचाकी चोरट्यांची माहिती प्राप्त केली. शुक्रवार (ता.१७)रोजी पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे व सहाय्यक पोलीस फौजदार राकेश बोलणे, नाईक भोजणे शिपाई खाडे ,गारोळे ,जोशी ,साळवे यांनी रेकॉर्डवरील आरोपी नामे सागर शिंदे याला सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने त्याचा साथीदार योगेश इले असे दोघांनी भोसरी एमआयडीसी या परिसरातून ०८दुचाकी काढून दिलेल्या आहेत ,या चोरीच्या दुचाकी गुन्ह्यांच्या तपासकामी जप्त करणे आलेले आहेत.
आरोपी सागर शिंदे हा अट्टल गुन्हेगार असून त्याने राहुरी पोलीस ठाणे ,अहिल्यानगर येथे दरोडासारखा गंभीर गुन्हा केला आहे .नमोद आरोपी कडून पुण्यातील चोरी केलेल्या एकूण ०३लाख ९०हजार रुपये किमतीच्या ०८दुचाकी हस्तगत करण्यात आलेले आहेत. भोसरी पोलिसांनी या आरोपी विरुद्ध भोसरी पोलीस ठाणे ०२,महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे ०६असे एकूण ०८गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ,सह आयुक्त डॉ.शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी ,पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे ,सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे ,पोलीस निरीक्षक (गुन्हे )सचिन शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे ,सहाय्यक पोलीस फौजदार राकेश बोयणे,महिला पोलिसावलदार नूतन गोंडे ,पोलीस नाईक प्रकाश भोजणे ,पोलिस अंमलदार प्रभाकर खाडे ,महादेव गारोळे ,ज्ञानेश्वर साळवे ,अनिल जोशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
———————————

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

