रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालकांकडुन चोरीच्या दोन मोटार सायकली जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २१/०१/२०२५ रोजी वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथक हे पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार गोपाळ मदने व यतीन भोसले यांना माहिती मिळाली की, जयसिंगराव ससाणे उद्यानासमोर दोन इसम संशयित रित्या वावरत असुन त्यांचेकडे चोरीचे वाहने आहे अशी बातमी मिळाली. त्याप्रमाणे वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सत्यजित आदमाने, यांचे मार्गदर्शनाखाली सुचना व आदेशाप्रमाणे तपास पथकाने योग्य ती कारवाई करुन जयसिंगराव ससाणे उद्यानासमोर, बी.टी कवडे रोड, घोरपडी येथे जाऊन दोन विधीसंघर्षीत बालक यांना त्यांचेकडील एकुण १,१०,०००/- रु.कि.चे दोन मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या तपासात त्यांनी एक दुचाकी नवीन म्हाडा हडपसर व दुसरी गाडी ही काळेवाडी, पिंपरी चिंचवड येथुन चोरी केली असुन तिचा वापर फिरण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले.
जप्त दुचाकी या चोरीच्या असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.

१) वानवडी पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं. ३५/२०२४, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३ (२) २) काळेवाडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड आयुक्तालय गु.र.नं. २५/२०२५ भा. न्या. संहीता २०२३ चे कलम ३०३(२) असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत

Advertisement

सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परि- ०५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सत्यजित आदमाने, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, यतीन भोसले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, सोमनाथ कांबळे, संदीप साळवे या विशेष पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!