चाकण पोलिस स्टेशन ची पुन्हा दमदार कारवाई ! सराईत मोटार सायकल चोरटा अशोक सोनवणेला शिताफीने अटक, त्याचेकडुन चोरीच्या एकुण १२ मोटार सायकली जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

चाकण पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठ्या प्रमाणात औदयगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी होत असल्याने मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिपंरी चिचंवड, सह पोलीस आयुक्त, श्री. सर्जय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ श्री. संदिप डोईफोडे, सहा, पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांनी मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत श्री. अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या. श्री. अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलीस ठाणे हददीतील गुन्हे उघडकरण्यासाठी सपोनि प्रसंन्न जन्हाड व विक्रम गायकवाड तसेच अमंलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले असता वरील अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोरीच्या घटनास्थळावर भेट देवून सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सराईत रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर अशोक मधुकर सोनवणे रा. राळेगन थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर हा मोटार सायकल चोरीमध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते.

मोटार सायकल चोर अशोक सोनवणे याच्या एका पेक्षा जास्त बायका असुन तो पुणे, अहमदनगर, नाशिक तसेच औरंगाबाद या जिल्हयांमध्ये आपले वेगवेगळी नावे सांगुन पोलीसांपासुन आपले अस्तित्व लपवुन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता त्यामुळे त्याचे निश्चित राहण्याचे ठिकाणा बाबत माहिती मिळत नव्हती.

श्री. अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी वाकण पोलीस स्टेशन कडील सपोनि विक्रम गायकवाड, सफौ सुरेश हिंगे, पोहवा हनुमंत कांबळे, पोकों संदिप गंगावणे, पोकों महेश कोळी यांचे पथक तयार करून आरोपी अशोक सोनवणे याचा शोध सुरू केला, पथकाने आरोपी अशोक सोनवणे याचा शिकापुर, शिरूर, राळेगण थेरपाळ, सुपे, भाळवणी तसेच नाशिक जिल्हयातील नांदगाव तालुक्यात आरोपीचा मागमुरा काढत सलत ०७ दिवस शोध घेवुन त्यास अतिषय शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल् या नतंर त्याचेकडे तपास केला असता त्याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हददीतुन चोरी केलेल्या एकुण १२ मोटार सायकली काढुन दिलेल्या असुन त्या गुन्हयावे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

Advertisement

एकुण १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या..

चाकण पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करून अतिशय शिताफिने आरोपी नामेअशोक मधुकर सोनवणे वय ४० वर्षे, रा. राळेगन थेरपाळ ता पारनेर जि अहमदनगर यास अटक केलेली असुन त्यांचेकडुन एकुण १२ मोटारसायकल जप्त करून मोटार सायकल चोरीच्या एकुण ०९ गुन्हयांची उकल केलेली आहे. तसेच इतर ०३ वाहनांच्या इंजिन नंबर व चेसी नंबर वरून वाहन मालकांची माहिती घेवुन उकल करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. युनुस मुलाणी तसेच सपोनि प्रसंन्न ज-हाड़, सपोनि विक्रम गायकवाड, सफौ सुरेश हिंगे, पो हवा / संदिप सोनवणे, पोहवा / राजु जाधव, पो हवा / हनुमंत कांबळे, पोना / निखील शेटे, पोकों / नितीन गुंजाळ, पोकों / सुनिल भागवत, पोकों / संदिप गंगावणे, पोकों / अशोक दिवटे, पोकों / महेश कोळी, पोकों / विवेक सानप, पोकों / प्रतिक चव्हाण, मपोकों / माधुरी कवाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सफौ संतोष सुपेकर हे करीत आहेत.

चाकण पोलीसाकंडुन अवाहन करण्यात येते की, 

१) आपण मोठ्या किंमतीच्या मोटार सायकली विकत घेता परंतु २/ ३ हजार रूपयांचे जीपीएस लावत नाही, आपल्या वाहनांना जीपीएस लावावे.

२) आपले वाहन सीसीटीव्ही च्या कक्षेत पार्कींग करावे,

३ ) वाहन रस्त्यावर कोठेही बेवासर सोडुन जास्तकाळ ठेवुन निघुन जावु नये. ४) आपले वाहनाचे गाडीला / डिकीला चावी सोडुन जावु नये.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!