सिंहगड रोड पोलीसानी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान संशयीतरित्या फिरणाऱ्या आरोपी कडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस केले हस्तगत.


पंकेश जाधव संपादक 7020794626

सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगडरोड पोलीस स्टेशन हादीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगडरोड पो स्टे पुणे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने दि.१०/०१/२०२४ रोजी पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बींग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्ड वरील आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार/आबा उत्तेकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खंडोजी बंडोजी चव्हाण शाळाचे पाठीमागे, नंदीबावरा मित्र मंडळाचे जवळ, मोकळया मैदानात, घायरी पुणे येथे एक इसम अंगात मरुन रंगाचा फुलबाहीचा डिझाईन असलेला शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला असुन त्याचे जवळ एक गावठी पिस्टल घेवुन थांबलेला आहे” अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सोबतचे सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी ती बातमी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगडरोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर शिकणी जावुन खात्री करुन पुढील योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनानुसार लागलीच सपोनि सचिन निकम यांनी सोबतच्या स्टाफाह खाजगी गाडीने निघुन खंडोजी बंडोजी चव्हाण शाळाचे पाठीमागे, नंदीबावरा मित्र मंडळाचे जवळ, मोकळ्या मैदानात, घायरी पुणे येथे येवुन मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसला त्याची व आमची नजरा नजर होताच तो त्या ठिकाणावरुन आमची नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच वरील स्टाफचे मदतीने काही अंतरावर त्यास दि.१०/०१/२०२४ रोजी २३.१५ वा. चे सुमारास पकडुन त्यास नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता प्रणव विनोद कुंभार वय- १९ वर्षे धंदा-शिक्षण रा. फ्लॅट नं. १०२/१०३ राजरत्न अपार्टमेंट बेनकरवस्ती चव्हाणशाळेजवळ धायरी पुणे असे सांगितले असता त्याची अंगझडती घेता त्याचे उजवे बाजुचे कंबरेस जिन्स पॅन्टच्या आत मध्ये एक ४५,०००/-रुपये किंमतीचे पिस्टल व पॅन्टचे खिश्यात ५००/- रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुसे असा एकुण ४५,५००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, श्री. संभाजी कदम सोा, मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ ३ पुणे, श्री आप्पासाहेब शेवाळे सोा, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे, श्री अभय महाजन, सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे, श्री जयंत राजुरकर सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाक्षी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास बांदल, विकास पांडुळे, दक्ष पाटील यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!