गुन्हे शाखा युनिट 2 उलेखनिय कामगिरी ! मोक्का गुन्हयातील आरोपी अटक…
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अंमलदार मोक्का गुन्हयातील पाहीजे आरोपींचा शोध घेत असतांना पोकॉ 1920 अजित सानप व पोना 1603 देवा राऊत यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन सखोल तांत्रीक विश्लेषण करुन निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 588/2023 भादवि कलम 307, 302, 326, 324, 143, 147, 148, 149, 504, भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सह 135 या गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन 1999 या कायद्याचे कलम 3 (1) (i) (ii), 3 (4) प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपीत नामे फिरोज मेहबुब कोरबु वय- 29 रा रुम नं 203 बि नं 5 उरवेला हौसिंग सोसायटी ओटास्किम निगडी पुणे यास नेहरुनगर पिंपरी येथुन पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, जमीर तांबोळी, देवा राऊत, आतिष कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीत यास गुन्हयाचेकामी मा. सहा.पोलीस आयुक्त साो. वाकड विभाग यांचेकडे हजर केले आहे
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार देवा राऊत, जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, आतिष कुडके, उषा दळे, शिवाजी मुंडे, नामदेव कापसे, उध्दव खेडकर, अजित सानप, जमीर तांबोळी, दिलीप चौधरी यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

