पुणे: अष्टेकर ज्वेलर्सची १.५५ कोटींची फसवणूक; बिबवेवाडीतील संचेती कुटुंबावर गुन्हा
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. — शहराच्या सराफ बाजारात मोठी खळबळ उडवणारी फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. रविवार पेठ येथील नामांकित अष्टेकर ज्वेलर्स यांची तब्बल १ किलो सोन्याची, अंदाजे १ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखहल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही फसवणूक कौटुंबिक ओळखीतील सराफ व्यावसायिकांकडूनच झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील उमेष ज्वेलर्स या पेढीचे मालक आणि अष्टेकर ज्वेलर्स यांच्यात दीर्घकालीन कौटुंबिक संबंध होते. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपींनी संगनमत करून १ किलो सोन्याची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. व्यवहारावेळी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने अखेर अष्टेकर ज्वेलर्स यांनी पोलिसांत धाव घेतली.
फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी बिबवेवाडीतील एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये
१) योगेश उमेश संचेती
२) उमेश तिलोकचंद संचेती
३) सौ. मंगला उमेश संचेती
यांचा समावेश आहे.
या प्रकरणी बीएनएस कायद्यांतर्गत कलम ३१६(२) (विश्वासघात), ३१८(२) (फसवणूक) आणि ३(५) (सामूहिक हेतू) अन्वये (सी.आर. नं. १५३/२०२६) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असून फरासखाना पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे पुण्यातील सराफ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विश्वासू संबंधांमधून झालेल्या या फसवणुकीची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

