पुणे सायबर पोलीस ठाण्याची धमाकेदार कारवाई ! मालवाहतुक करणाऱ्या नामांकित कंपनीच्या नोकराने केली कंपनीची ५५ लाखाची सायबर फसवणुक
पंकेश जाधव संपादक 7020794626
पुणे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२),३१८(४),६१ (२),३१६(२),३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६सी, ६६डी या गुन्ह्याचे तपासकामी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांचेकडील गुन्ह्यातील आरोपी शोध घेणकामी पोउपनिरी संदिप कदम, पोहवा ६९०७ नवनाथ कोंडे, पोशि ८४३९ संदिप पवार, पोशि १०१०७ दिनेश मरकड यांनी वेशांतर करुन सोलापुर परिसरामध्ये शोध घेवुन कंपनीला गंडा घालणारे एकुण ४ आरोपी अटक करुन गुन्हा उघड केला आहे.
मालवाहतुक करणाऱ्या नामांकित कंपनीला दि.२१/१२/२०२४ रोजी रात्रौ ०२.२० वा ते दि.०२/०१/२०२५ रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने कंपनीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने अप्रमाणिकपणे, कट करुन कंपनीचे व्हेन्डरच्या कामाच्या पेमेंट संदर्भात असलेल्या गुगलशिटच्या लिंकमध्ये कंपनीच्या दिल्ली येथिल खऱ्या व्हॅन्डरच्या बँक खात्याची माहिती बदलुन अज्ञात इसमाने स्वतःचे बँक खाते क्रमांकाची माहिती टाकुन गुगल शिट कंपनीला ऑनलाईन दाखल केली. दाखल केलेली माहिती हि खऱ्या व्हेन्डरने पाठवलेली आहे असे कंपनीच्या फायनान्स विभागास भासवुन सदर फायन्सास विभागास अज्ञात व्यक्तीचे बँकखाते कंपनीच्या सिस्टीमध्ये जोडण्यास भाग पाडले व खऱ्या व्हेन्डरला माल वाहतुकीबाबत ट्रान्सफर करावयचे पेमेंट ५५,५४,९९९/-रु. हे अज्ञाताच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यास लावुन कंपनीची ५५.५४,९९९/- रु. ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दि.०६/०१/२०२५ रोजी कंपनीच्या फायनान्स विभागच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली आहे.
सदर गुन्ह्यात कंपनीचे गुगल शिट लिंकबाबत तांत्रिक विश्लेषण करुन तसेच अज्ञात बँक खात्याबाबतची माहिती घेवुन गुन्ह्यातील आरोपी सोलापुर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि संदिप कदम, पोहवा नवनाथ कोंडे, पोशि संदिप पवार, पोशि दिनेश मरकड असे खाजगी वाहनाने सोलापुर येथे रवाना झाले. आरोपी आकाश करिअप्पा गायकवाड धंदा कैब ड्रायव्हर, रा. ए.जे. पाटील नगर, सोलापुर व शिवानंद बसवराज तळवडे धंदा किराणा दुकान रा विजापुर रोड सोरेगाव, सोलापुर हे सात रस्ता चौक, सोलापुर आणि सोरेगाव, सोलापुर येथे असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ क्षणाचा विलंब न करता त्यांचा वेशांतर करुन शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मालवाहतुक करणाऱ्या नामांकित कंपनीतीलच कारकुन आरोपी उमेर हमीद शेख रा- लक्ष्मीनगर भारत बेकरी जवळ, नुराणी मशिद, येरवडा, पुणे याने त्याचा मित्र आरोपी सोन्या उर्फ आकाश राजु परीट, रा- महाराष्ट्र हौ. बोर्ड, नागपुर चाळ येरवडा पुणे. ४११००६. याचे मदतीने कंपनीच्या गुगलशिट मध्ये फेरफार करुन कंपनीतुन ५५,५४,९९९/- रुपये रक्कम फसवणुक करुन काढुन घेण्याचा प्लॅन केलेला असुन कंपनीच्या फसवणुक केलेले पैसे हे फरार आरोपी मंजुनाथ भिमडे रा. सोलापुर याच्या बँक खात्यावर घेवुन ती सर्व रक्कम आम्ही सर्वानी वाटुन घेतली आहे असे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे तपास पथक सोलापुर वरुन पुण्यामध्ये येवुन त्यांनी कंपनीचा कारकुन उमेर शेख व त्याचा मित्र आकाश ऊर्फ सोन्या परिट यास येरवडा, पुणे या ठिकाणी वेंशांतर करुन शिताफिने पकडुन त्यांना अटक करुन सायबर गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार सोो. पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा सोो, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री शैलेश बलकवडे सोो. (गुन्हे) पुणे शहर, मा. पोलीस उप-आयुक्त श्री विवेक मासाळ सोो., आर्थिक व सायबर पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मच्छिंद्र खाडे, आर्थिक व सायबर पुणे यांचे मार्गदर्शनाखाली स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक संदिप कदम, पोहवा कोंडे, पोशि. ८४३९ संदिप पवार, पोशि. १०१०७ दिनेश मरकड, पोहवा मुंढे, पोशि यादव, पोशि १०७१६ नागटिळक यांनी सदरची कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

