५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ पोलीस उप मुख्यालय, बऱ्हाणपुर पुणे ग्रामीण येथे उद्घाटन समारंभ संपन्न
आसमा सय्यद पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- ५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ आयोजित करण्याचा मान यावर्षी पुणे ग्रामीण पोलीस दलास मिळाला आहे. या क्रीडा स्पर्धा दिनांक १७. ११.२०२५ ते दि.२१.११.२०२५ या कालावधीमध्ये पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस उप मुख्यालय, बऱ्हाणपुर बारामती, पुणे ग्रामीण येथे पार पडणार आहेत.
दि.१७.११.२०२५ रोजी ५१ व्या कोल्हापुर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी मा.श्री संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक साो, पुणे ग्रामीण हे निमंत्रीत होते. तसेच याप्रसंगी मा. श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, पुणे, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हे ही उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमा दरम्यान पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस उप मुख्यालय, बहऱ्हाणपुर बारामती पुणे ग्रामीण याठीकाणी मान्यवरांचे आगमनावेळी यमाई हलगी ग्रुप अकलुज, सोलापूर यांनी हलगी नाद करून स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांना श्री. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, बारामती यांनी रोपटे देवुन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या बॅन्ड पथाने मानवंदना दिली. दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल श्री. शाहरूख शेख यांनी मशालसह मशाल रन किडांगणावर केला व त्यानंतर किडाज्योतीचे मुख्य अतिथी यांचे हस्ते प्रज्वलन करुन व त्यानंतर उपस्थित खेळाडूंनी शपथ घेतली.
श्री सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग यांनी सर्व खेळाडु, उपस्थित अधिकारी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कोल्हापुर परिक्षेत्रातील खेळाडुंनी सतत ११ वेळा महाराष्ट्र राज्य पोलीस कीडा स्पर्धेमध्य सर्वसाधारण विजेते पद मिळावले असून त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच आगामी स्पर्धेकरीता सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर मा पोलीस अधीक्षक साो, पुणे ग्रामीण यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, प्रत्येक माणसाने स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. तसेच सर्व खेळाडुंनी दिलेल्या नियमांचे पालन करुन खिलाडू वृत्तीने खेळावे बाबत मार्गदर्शन करुन सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
सदरील क्रीडा स्पर्धेमध्ये ०७ प्रकारचे विविध सांघिक खेळप्रकार तर १२ प्रकारचे विविध वैयक्तिक खेळप्रकारांचा समावेश असून सदर स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर ग्रामीण व सोलापुर शहर या घटकातील ९०० पुरुष व २५० महिला पोलीस विभागाकडून उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविलेला आहे. सदरच्या स्पर्धा या विदयाप्रतिष्ठान मुख्य मैदान बारामती पुणे, बऱ्हाणपुर उपमुख्यालय बारामती पुणे, अॅग्रीकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट मुख्य मैदान शारदानगर, बारामती, विर सावरकर भवन जलतरण मैदान बारामती याठिकाणी होणार आहेत.
यावेळी पोलीस विभागात कशापध्दतीने आयोजन केले जाते व शिस्तबध्द पध्दतीने खेळ कसे खेळले जातात याबाबत छोटया मुलांमध्ये उत्सुकता असते त्यासाठी न्यु इंग्लिीश मिडीयम स्कुल, बारामती, थोरात इंग्लिश मिडीयम स्कुल भिगवण तसेच धोंडीबा आबाजी सातव हायस्कुल बारामती येथील शाळेतील मुलांनी खेळाच्या मैदानावर उपस्थित राहून वैयक्तीक खेळ व सांघिक सामन्यांचा आनंद लुटला.
दि.१७/११/२०२५ रोजी विविध सांघिक व वैयक्तीक स्पर्धा पार पडल्या असून यामध्ये १०००० मीटर धावणे पुरूष स्पर्धेत श्री हर्षवर्धन दबडे सातारा, ५००० मी धावणे महिला, स्पर्धेत ऋतुजा कांबळे पुणे ग्रामीण, ८०० मी पुरूष धावणे स्पर्धेत ओंकार कुंभार कोल्हापुर, लांबउडी महिला आरती फाळके सातारा, लांबउडी पुरूष निहाल मोरे सातारा, ११० मी हार्डल्स पुरूष अमृत तिवळे कोल्हापुर, तर १०० मी महिला हार्डल्स वैष्णवी शिंदे सातारा यांनी नैपुण्य दाखवले व सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
सदर कार्यकमाचे आभार प्रदर्शन श्री राजेंद्र मायने, पोलीस उप अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांचे तसेच आयोजन समितीचे उत्कृष्ट नियोजनाबददल आभार मानले तसेच सहभागी खेळाडुंचे आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

