विनापरवाना विनाकारण आकाशात उडणारे ड्रोन प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांकडून अँटी ड्रोन गन खरेदी चा प्रस्ताव पाठविणेत येत आहे.


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मागील १५ दिवसांपासून पुणे ग्रामीण जिल्हयाचे पुर्व भागात रात्रीचे वेळी अचानक ड्रोन दिसत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण झाले होते. ड्रोन दिसल्याने नागरीकांमध्ये विविध अफवा पसरल्याने रात्रीचे वेळी दिसणारे ड्रोन बाबत नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीसांकडून विशेष तज्ञाची मदत घेवून ड्रोन प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता चालू आठवडयात विंडलाईट ड्रोन कंपनी च्या अँटी ड्रोन गनचा वापर करून ड्रोन खाली उतरविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे. अँटी ड्रोन गन च्या वापराने विनापरवाना आकाशात उडणारे ड्रोन खाली उतरविण्यास मदत होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलीसांकडून विंडलाईट ड्रोन कंपनी कडून दोन अँटी ड्रोन गन खरेदी करणेकरीता पुणे जिल्हा नियोजन विकास समिती कडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे.

Advertisement

रात्रीचे वेळी दिसणारे ड्रोन मुळे नागरीकांनी भयभीत होवू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरीकांनी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीसांचे वतीने करणेत येत आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!