सिंहगडरोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपीस एक अग्नीशस्त्र व एक जीवंत काडतुसासह केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि.३१/०३/२०२४ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड पो स्टे पुणे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयीत इसम चेक करीत असताना पोलीस अमंलदार अमोल पाटील यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “स्वामीनारायण मंदीराच्या बाजुच्या सर्व्हिस रोड नन्हे पुणे येथे अंगामध्ये पिवळ्या रंगाचा फुलभाईचा टि शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम हातामध्ये पिस्टल घेवून उभा आहे.” अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळविली असता मा. वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री करता, बातमीतील वर्णनाचा एक इसम हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसला त्याची व आमची नजरा नजर होताच तो सदरचा इसम त्या ठिकाणावरुन आमची नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास स्टाफचे मदतीने पाठलाग करुन काही अंतरावर त्याला शिताफीने पकडून, त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव साईनाथ चंडु आडे वय १९ वर्षे रा. शिवानी हॉटेलच्यावर, जे एस पी एम कॉलेज जवळ, पहीला मजला नन्हें पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता, त्याचे पॅन्टच्या आत मध्ये खोसलेले एक ४५,०००/- रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व पॅन्टचे खिश्यात ५००/-रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुसे असा एकुण ४५,५००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे, शहर हे करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार साो पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सोो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, श्री. भिमराव टिळे सो, सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. विजय कुंभार सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पो स्टे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल, यांचे पथकाने केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

