नौपाडा पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी ! १ कोटी ३० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणा-या आरोपीतास अटक
संपादक :- पंकेश जाधव 7020794626
नौपाडा पोलिस स्टेशन ठाणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन ठाणे :- दिनांक ११/०५/२०२४ रोजी फियादी नामे यशवंत घेवरचंद पुनमिया यांनी फिर्याद दिली की, त्यांचे विरासत ज्वेलर्स नावाचे दुकानामध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणारा इसम नामे विशालसिंग कानसिंग राजपूत वय २९ वर्षे याने फिर्यादीचा विश्वासघात करुन त्याचे ताब्यात विश्वासाने सिध्दार्थ ज्वेलर्स येथून विरासत ज्वेलर्स येथे आणण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने विरासत ज्वेलर्स येथे न देता, विरासत ज्वेलर्स येथून इतर सेल्समनची नजर चुकवुन पुन्हः काही सोन्याचे दागिने चोरी करून, असे एकुण ०१,३०,१४,७२०/- रू. किंमतीचे १८०७.६०० ग्रॅम वजनाचे दागिने चोरी केले आहेत. फिर्यादी यांनी वरील प्रमाणे फिर्याद दिल्याने नौपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६४१/२०२४ भा.द.वि. कलम ३८१,४०८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास सपोनि मंगेश भांगे हे करीत असुन, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त श्री. सुभाष बुरसे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहर कुंभार यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तपासी अधिकारी यांनी तपास चालु केला होता.
सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी याची अधिक माहिती घेतली असता, यापुर्वी आरोपीने त्याचे साथीदारांसह अशाच प्रकारे रोख रक्कम चोरी केल्याने त्याचेवर एल. टी. मार्ग पोलीस स्टेशन, मुंबई येथे गु.रजि.नं. २६८/२०१६ भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. आरोपी याने दागिने चोरी केल्यानंतर त्याने त्याचे मुळगावाचा पत्ता पोलीसांना मिळू नये म्हणून त्याने ज्वेलर्स दुकानात असलेले त्याचे आधारकार्ड व इतर कागदपत्र काढून घेवून गेला होता. तसेच आरोपी वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा सांगली येथील माथाडी कामगाराच्या नावावर असून फोन बंद असल्याने आरोपीचा शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे विशालसिंग हा मुळ कोणत्या ठिकाणचा राहणारा आहे. येथून तपासाची सुरवात झाली.
आरोपीचा शोध घेण्यासाठी ठाणे शहरातील तसेच ईतर ठिकाणावरील सुमारे १०० हुन अधिक सी.सी. टी. व्ही. फुटेज तपासले असता सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याने ठाणे शहर ते वसई रोड जाण्याकरीता ०८ ते १० रिक्षा बदलून प्रवास केला. दरम्यान आरोपीने एका हिंदी सिनेमामध्ये पुरावा नष्ट करण्याची पध्दत पाहुन त्याप्रमाणे अहमदाबाद येथे जाण्यापुर्वी पोलीसांची दिशाभुल करण्यासाठी त्याचेकडील मोबाईल हा त्याने मुंबईच्या दिशेने जाण्या-या एका टकमध्ये टाकुन दिला व अहमदाबाद कडे रवाना झाला.
आरोपी त्यानंतर वसई रोड येथून अहमदाबाद, गुजरात येथे बसने गेला होता. आरोपी हा फरार असतानाचे काळात तो जैयसलमेर, पालनपूर, जोधपूर, डिसा, बिकानेर, उदयपूर, जयपूर, माउंट आबू पर्वत, अहमदाबाद, बनसाकांटा, गुजरात, राजस्थान अशा वेगवेगळया ठिकाणी रात्री बसने प्रवास करून, दिवसभर एखाद्या निर्जन ठिकाणी जावून फिरत होता व पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करीत होता. आरोपीच्या नातेवाईक, पत्नी व मित्र यांचे हालचालींवर लक्ष ठेवुन आरोपीचा शोध घेत असताना दिनांक ०२/०६/२०२४ रोजी आरोपी हा माउंट आबू पर्वत, राजस्थान येथे असल्याची पोलीसांना माहीती मिळाली. त्यावरुन पोलीसांची एक टिम माउंट आबू पर्वत, राजस्थान येथे रवाना होवून, तेथे पर्यटन स्थळ असल्याने तेथील सार्वजनिक ठिकाणे, लॉजेस, वाहनतळ, बस डेपो, धर्माशाळा येथे चार दिवस सलग रात्रंदिवस रेकी करून केली असता पोलीसांना अशी माहीती मिळाली की, आरोपी हा माउंट अबु पर्वतातील जंगलामध्ये दिवसभर मुक्काम करतो व रात्री मिळेल त्या बसने झोप पुर्ण करण्यासाठी प्रवास करीत आहे. आरोपीस ताब्यात घेण्याचे १ दिवस आधी उदयपुर येथुन माउंट अबु येथे आला असुन तो जंगलामध्ये लपलेला आहे. अशी माहीती पोलीसांना मिळाल्याने पोलीसांनी वेशांतर करुन जंगलामध्ये फिरण्यास सुरवात केली असता अबु पर्वताच्या एका भागात आरोपी पोलीसांनी दिसला पोलीसांना त्याने ओळखल्याने तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन सपोनि भांगे व त्यांचे टिम ने आरोपी नामे विशालसिंग कानसिंग राजपूत वय २९ वर्षे रा. ओढवा, ता. दांतीवडा, जिल्हा बनासकांटा राज्य गुजरात यास माउंट आबू पर्वत येथील जंगलात शिताफीने ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्हयाकामी दि. ०७/०६/२०२४ रोजी १४:१५ वा. अटक केली आहे. आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची दिनांक १२/०६/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. दुकानातील मोठ्या प्रमाणात सोने चोरी करुन, तिन ते चार महिने परराज्यात इतरत्र फिरून, चोरी केलेले दागिने विकून मिळालेल्या पैशातून अहमदाबाद येथे घर घेवून स्थायिक होण्याचा त्याचा मनसुबा होता.
अटक आरोपीकडुन तपासा दरम्यान चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिन्यापैकी सुमारे ०१,२६,००,००० /- रुपये किंमतीचे १७४५.०८० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित दागिन्यांबाबत आरोपीकडे तपास चालु आहे.
सदर कामगिरी हि मा.पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रा. विभाग श्री. विनायक देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, परि. १ श्री. सुभाष बुरसे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीगती प्रिया ढाकणे नौपाडा विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन, पोनि (गुन्हे) श्री. शरद कुंभार, पोनि सुनिल तांबे (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे, सहायक पोलीस निरीक्षक, पोउनि, पोउनि दत्तात्रय लोंढे, पोउनि मकानदार, पोहवा /२८५ गायकवाड, पोहवा /१२१९ पाटील, पोहवा/४६९६ देसाई, पोहवा/५६ रांजणे, पोहवा/६३३४ गोलवड, पोहवा/६४६५ तडवी, पोहवा/३१४६ विरकर, पोना/७२६१ माळी, पोशि/७६९५ कांगणे, पोशि/२५५६ तिर्थकर, यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

