येरवडा खुले जिल्हा कारागृह, वर्ग-1 श्रृंखला उपहारगृह -2 चे भुमीपूजन समारोह
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा खुले जिल्हा कारागृह, पुणे जिल्हा
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- मा.अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाने येरवडा खुले जिल्हा कारागृह बंदी संचलित श्रृंखला उपहारगृह हे दि.09 ऑगस्ट 2023 रोजी सुरु करण्यात आले असून श्रृंखला उपहार गृहाच्या माध्यमातुन कारागृहातील बंदयांना पुनर्वसनाचे दृष्टीने कारागृह विभागाने एक चांगले पाऊल उचलले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हयातील कारागृहात श्रृंखला उपहार गृह बंदयांकडून
यशस्वीरित्या चालविण्यात येत असून त्याचा फायदा नागरिकांना व बंदयाचे नातेवाईकाना होत आहे. येरवडा खुले जिल्हा कारागृह येथील पहिल्या श्रृंखला उपहारगृह यशस्वी वाटचालीनंतर व नागरिकांचे
चांगल्या प्रतिसादानंतर मा. श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. श्री. जालींदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), मुख्यालय, पुणे व मा.श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांचे मार्गदर्शनाने श्रृंखला उपहारगृह -2 सुरु करण्यात येत असून त्याचा भुमीपुजन समारोह, बंगला क्र.9, डॉन बॉस्को हायस्कुल गेट नं.3 समोर, शास्त्रीनगर, येरवडा, पुणे-6 या ठिकाणी आज दि.10.06.2024 रोजी सकाळी 11.00 वा.मा.श्री. अमिताभ
गुप्ता साहेब यांचे हस्ते पार पडला आहे.
या कार्यक्रमाचे प्रसंगी मा. श्री. अमिताभ गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रसार माध्यमांना या श्रृंखला उपहारगृह संकल्पनेची माहिती देऊन बंदयांमध्ये सकारात्मकता वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरु करण्यात आल्याचे सांगितले तसेच सर्व नागरिकांनी देखील याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व मा.श्रीमती स्वाती साठे मॅडम, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांनी देखील श्रृंखला मध्ये सर्व प्रकारच्या खाण्याचे पदार्थ मिळत असून या उपक्रमामुळे कैदयांचे मनोबल वाढून त्यांचे चांगल्या प्रकारे पुर्नवसन होत असल्याचे सांगितले.
सदरील कार्यक्रमास विशेष उपस्थिती मा.डॉ.श्री. जालींदर सुपेकर साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), मुख्यालय, पुणे यांची होती व मा. श्री. नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे, मा.श्री. सुनिल ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, श्री. अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले जिल्हा कारागृह, पुणे, श्री. राजेंद्र मरळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, श्रीमती निशा श्रेयकर, तुरुंगाधिकारी श्रेणी-2 तसेच कारागृहाचे इतर अधिकारी व कर्मचारी वृंद हे सर्व उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

