नागपूर मध्यवर्ती कारागृहात बकरी ईद निमित्त कारागृहातील प्रार्थना भवन येथे जामिया अरेबीय इस्लामीया संस्थेच्या माध्यामातून नमाज अदा करण्यात आले


पंकेश जाधव संपादक 7020794626

नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक 17 जून 2024 रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे बकरी ईद कार्यक्रमाचे आयोजन कारागृहातील प्रार्थना भवन येथे जामिया अरेबीय इस्लामीया, नाल साहेब रोड, नागपूर या संस्थेच्या माध्यामातून करण्यात आले. बकरी ईद चा नमाज अदा केल्यानंतर
कारागृह अधीक्षक श्री.वैभव सु.आगे यांनी बंदयांना मार्गदर्शन करतांना बंदयांना बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या तसेच आपआपसातील दु:ख वाटून दुसऱ्यांचे दु:ख दुर करता येते. असे सांगितले तसेच यावेळी त्यांनी संत कबीर यांच्या दोहयांचे उदाहरण देवून बंदयांना मार्गदर्शन केले.

Advertisement

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय ।
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ।।

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारागृह अधीक्षक श्री.वैभव आगे, उप अधीक्षक, श्रीमती दिपा वै.आगे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी श्री.आनंद पानसरे, श्री. नरेद्रकुमार अहिरे, श्री.श्रीधर काळे,‍ तुरुंगाधिकारी श्री.राजेद्र ठाकरे श्री.अमोल वानखडे, श्री. अतुलकुमार काळे कारागृह शिक्षक श्री.लक्ष्मण साळवे, यांनी परिश्रम घेतले. यावेळी इतर कारगृहिकारी / कर्मचारी हजर होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!