नन्हे आंबेगाव येथील भेसळयुक्त गुटखा तयार करणारी फॅक्टरी, गोडावुन व फार्म हाऊसवर छापा कारवाई करुन १,६३,२४,३००/-रु. गुटखा, व डुब्लीकेट गुटखा जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणें शहर
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- शहरामध्ये बेकायदेशिर अवैध धंदयावर गुन्हे शाखेमार्फत कारवाई चालु असताना दिनांक १५/०६/२०२४ रोजी युनिट २ गुन्हे शाखेकडील सपोनि रसाळ व त्यांच्या पथकाला गोपनिय माहीती मिळाली की, नन्हे आंबेगाव भागात गुटखा व डुब्लीकेट गुटखा तयार करण्याची फॅक्टरी व गोडावुन असुन सदर ठिकाणी माल तयार करुन साठा करुन विक्री करत आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली असता, वरिष्ठ अधिकारी यांनी गुन्हे शाखेकडील ४ पथके तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. दिनांक १५/०६/२०२४ रोजी गुन्हे शाखेकडील वरील नमुद पथकांनी अभिनव कॉलेज रोडला, मारुती मंदीराजवळ, खाडेवाडी, नन्हे गाव पुणे येथे १७.३० वा. छापा कारवाई करुन ” आर. एम. डी. चौकीदार तयार गुटखा व आर.एम.डी गुटखा तंबाखु, आर. एम. डी गुटखा सुपारी तंबाखु, आर.एम.डी तंबाखु मिश्रीत गुटखा, गुटखा तयार करण्यासाठी सुपारी व इतर कच्चा माल व गुटखा वितरित करण्यासाठी दोन टेम्पो ” असे महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना व त्यापासुन मानवी जिवीतास हानी व अपायकारक होत असल्याची जाणीव असताना त्यापासुन कॅन्सर रोगाचा संसर्ग होण्याची माहीती असतानाही ४ इसम मिळुन आले. सदर इसमांकडे चौकशी करता त्यांनी त्यांची नावे १) पुष्पेंद्र अकबाल सिंग, वय २७ वर्षे, रा. मुळगाव- महानोरा, जि. उन्नव, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. हरिआनंद सोसायटी, फ्लॅट ४१०, ४ था मजला, सिध्दी चौक, अभिनव कॉलेज जवळ, नन्हे, पुणे, २) सुनिल पथ्थन सिंग, वय ४५ वर्षे, रा. मुळगाव महानोरा, जि. उन्नव, राज्य- उत्तरप्रदेश, सध्या रा. हरिआनंद सोसायटी, फ्लॅट ४१०, ४ था मजला, सिध्दी चौक, अभिनव कॉलेज जवळ, नन्हे, पुणे, ३) मुकेश कालुराम गेहलोत, वय २८ वर्षे, रा. मुळगाव मांडा, ता. मारवाड, जि. पाली, राज्य- राजस्थान, सध्या रा. साई किरण अपार्टमेंट, हाऊस नं २, नवले ब्रिज जवळ, आंबेगाव, पुणे, ४) चंदन अजयपाल सिंग, वय ३२ वर्षे, रा. मुळगाव- महानोरा, जि. उन्नय, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. हरिआनंद सोसायटी, फ्लॅट ४१०, ४ था मजला, सिध्दी चौक, अभिनव कॉलेज जवळ, नन्हे, पुणे, असे सांगुन सदर गोडावुन व कच्चा माल हा निलेश ललवानी, रा. नवले ब्रिजवळ, नन्हे, पुणे यांचा असुन त्यांचे सोबत आम्ही येथे साठा करुन बेकायदेशिर गुटखा तयार करून विक्री करत असल्याचे सांगितले. सदर ठिकाणावरुन १,३५,९२,८००/- रू. चा प्रतिबंधीत केलेला गुटखा, व गुटखा तयार करण्याचे साहित्य, कच्चा माल, पंचनाम्याने जप्त करुन गोडावुन सिल करण्यात आलेला आहे. सदर बाबत सिंहगड पोलीस स्टेशन येथे गुरनं ३४७/२०२४ भा.दं. वि. कलम ३२८,१०९,१२० (ब), २७२,१८८, अन्न सुरक्षा आणि मानके अधि.२००६ चे कलम ३० (२) (अ),३१(१),२६ (२) (1).२६ (२) (IV), अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिविशन अॅन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २,३,४ व सहवाचन ३ (1) ZZ चे उल्लंघन करुन ५९ नुसार गुन्हा दाखल करुन वरील ४ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीतांना मुदतीत मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि.२०/६/२०२४ अन्वये पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे. पोलीस कस्टडीमधील आरोपीतांकडुन नन्हे आंबेगाव येथे भेसळयुक्त गुटखा तयार करण्याची फॅक्टरी मधुन १९.५१.५००/- रु.चे भेसळयुक्त गुटखा, भेसळयुक्त कच्चा माल व मशिनरी जप्त करून फॅक्टरी सिल करण्यात आलेली आहे. खेड शिवापुर येथील वरवे खुर्द गावाजवळील गुन्हयातील मुख्य आरोपी याचे फार्म हाऊस मधुन ७,८०,०००/- रु.चा गुटखा तयार करण्याचा कच्चा माल पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला असुन फार्म हाऊस सिल करण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये एकुण १.६३.२४,३००/- (एक कोटी त्रेसष्ट लाख चोवीस
हजार तीनशे रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हयातील मुख्य आरोपीचा व गुन्हयाचा अधिक तपास सपोनि अमोल रसाळ युनिट २ गुन्हे शाखा है करीत आहेत.
गुन्हे शाखा युनिट २ कडील सपोनि अमोल रसाळ, पोउपनिरी पाटोळे, श्रेपोउपनिरी कांबळे, पोहवा २५७२ संजय जाधव, पोहवा ५७८५ शंकर नेवसे, पोहवा ६६०७ अमोल सरडे, पोहवा ६९६६ प्रमोद कोकणे, पोहया ७६२७ पवार, मपोहवा ५९६३ ताम्हाणे पोअमं ८४०३ गजानन सोनुने, पोअमं ८१३४ चव्हाण, पो ना ७४०० राख असे अवैध
धंदयावर सिंहगड पोलीस स्टेशन भागात गस्त करीत असताना पो. हवा ६६०७ अमोल सरडे, पो. अमं. ८४०३ गजानन सोनुने, पो. अमं. ८१३४ पुष्पेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील छापा कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त श्री प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री सुनिल तांबे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक श्री जाधव, सपोनि श्री अमोल रसाळ व युनिट २ कडील स्टाफ, पोलीस निरीक्षक श्री रंगराव पवार वाहनचोरी व दरोडा विरोधी पथक १ व त्यांचेकडील स्टाफ, पोलीस निरीक्षक प्रतापराव मानकर, खंडणी विरोधी पथक २ व स्टाफ व सामाजिक सुरक्षा कडील सपोनि श्री राजेश माळेगावे व त्यांचेकडील स्टाफ यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

