रक्षाबंधन सणानिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळावा उद्घाटन सोहळा
पंकेश जाधव संपादक 7020794626
येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकल्पनेतुन व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली कारागृह उद्योग अंतर्गत बंद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तुंना बाजारपेठ उपलव्ध होण्याच्या दृष्टीकोनातुन “रक्षाबंधन सणानिमित्त” कारागृह निर्मित वस्तुंचे विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन मा. श्रीमती. स्वाती साठे,कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या शुभहस्ते दि.२०.०८.२०२४ रोजी करण्यात आले.
“सुधारणा व पुनर्वसन” हे कारागृह विभागाचे ब्रीद असुन कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक आहे. बंद्यांमध्ये विविध प्रकारचे उपजत कलागुण असतात व त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बंद्यांना कारागृहात विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार बंद्यांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलव्ध व्हावी, या उद्देशाने “रक्षाबंधन सणानिमित्त” या सणाचे औचित्य साधुन बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर विक्रि व प्रदर्शन मेळाव्यामध्ये बंद्यांनी सागवान लाकडापासुन तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, शोभेच्या वस्तु, पर्यावरण पुरक गणेश मुर्ती, राख्या, कपडे, हातरुमाल, टॉवेल, बेडशीट, चादरी, बेकरी पदार्थ, बिस्कीट तसेच इतर वस्तु विक्रिस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सदर प्रदर्शनास सामान्या नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून अतिशय माफक दरात उच्च दर्जाच्या कारागृह बंदी निर्मित विविध वस्तु उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
सदर कार्यक्रमास मा. श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, मा. श्री. नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यायल, पुणे, मा. श्री. अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, मा. श्रीमती. पी पी कदम, अति. अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह श्री. आर. ई गायकवाड, उपअधीक्षक, श्री. एम. एच. जगताप, उपअधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी व अधिकारी / कर्मचारी, लिपिक / तांत्रिक संवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

