वानवडी पोलीस तपास पथकाने लोणवळयातुन टेम्पो चोरट्यास केली अटक व घेतला टेम्पो ताब्यात


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे दि. २२/०८/२०२५ रोजी रात्री ०८/०० वा. ते दि. २३/०८/२०२५ रोजी सकाळी १०/३० वा. चे सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, अण्णाभाऊ साठे उद्यानसमोर रामटेकडी हडपसर पुणे येथुन फिर्यादी शाहरुख शब्बीर शेख यांचा एकुण २,५०,०००/-रु.कि.चा अशोक लेलँन्ड कंपनीचा दोस्त मिनी टेम्पो नं. आर. टी. ओ नंबर M.H. 14 GD 4823 यास लॉक व पार्क केलेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे परवानगीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
चालक, रा. वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी सपोनि महाडिक व स्टाफ यांनी घटनास्थळी भेट देऊन त्याचा तपास चालु केला. घटनास्थळापासुन आजु-बाजूचे परिसर पासुन चाकण पर्यंत साधारण ३०० ते ३२० सी.सी.टि.व्ही. फुटेज कॅमेरे चेक केले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले व दिपक क्षीरसागर यांना मिळालेल्या बातमीवरुन आज दि. २३/११/२०२५ रोजी कैलासनगर, लोणावळा, पुणे ग्रामीण येथे रोडच्या बाजुला टेम्पो थांबलेला आढळुन आला. तेथे रात्रीच्या वेळेस आडबाजुस थांबुन टेम्पोवर लक्ष ठेऊन वानवडीचे तपास पथक सापळा लाऊन थांबले. काही वेळाने एक इसम आला व त्याने तो टेम्पो चालु करुन निघण्याचे तयारीत असताना त्यास स्टाफसह आहे त्या परिस्थतीत आज रोजी ०३.०० वा. ताब्यात घेतले. त्याचे नाव गणेश शंकर पवार, वय-२५ वर्षे, धंदा कैलासनगर, नवाज शेख यांचेकडे भाडयाने, नदीच्या जवळ, लोणावळा, जिल्हा पुणे असे सांगितले. त्याचेकडे सखोल तपास करता त्याने सांगितले की, सुमारे तीन महिन्यापुर्वी मी व माझा सहकारी श्रावण वाघमारे रा. लोणावळा रेल्वे स्टेशन परिसर असे आम्ही दोघे फिरत फिरत हडपसर येथे गेलो होतो. आम्हांस परत येण्यास वाहन नसल्याने आम्ही दोघांनी रामटेकडी येथुन हा टेम्पो चोरी करुन लोणावळा येथे घेऊन आलो व त्याचा भंगार वेचण्यासाठी वापर करीत होतो वगैरे सांगितले. नमुद आरोपीचे ताब्यातुन २.५०,०००/- रु.कि.चा एक आयरीश ग्रीन रंगाचा अशोक ले लॅन्ड कंपनीचा दोस्त मिनी टेम्पो त्याचा आर. टी. ओ नंबर M.H. 14 GD 4823 हा जप्त केला व सदरचा वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी श्रावण वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कारवाई ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई, सहा. पोलीस आयुक्त सोो, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री. भाऊसाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजयकुमार डोके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे स.पो.नि. उमाकांत महाडिक, पोउनि अल्फाज शेख व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, दिपक क्षीरसागर या तपास पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!