मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थविक्री करणाऱ्या गुन्हेगारांस केले जेरबंद
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व स्टाफ हे दि. १६/१०/२०२५ रोजी वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थविरोधी कारवाईचे अनुशगाने पेट्रोलिंग करीत असताना, दिपक क्षीरसागर व अभिजित चव्हाण यांना त्यांचेगुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, “एक इसम काळ्या रंगाची चेतक इलेक्ट्रीक स्कुटरवर न्यु कमांड हॉस्पीटल गेट नं.१ जवळ लुल्लानगरकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला, वानवडी पुणे येथे संशयितरित्या थांबला असुन त्याचेकडे काहीतरी संशयित वस्तु आहे. “अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दोन टिम करुन बातमीचे ठिकाणी जावुन खात्री करुन पाहता, तेथे अंधाराचा सहारा घेऊन संशयास्पदरित्या एक इसम त्याचेकडील चेतक मोपेडवर कोणाची तरी वाट बघत थांबलेला असल्याचे दिसुन आला. वानवडी पोलीस ठाणे तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन अचानकपणे छापा टाकला असता बातमीतील वर्णनाचे इसम हा पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना जागीच शिताफीने पकडुन ताब्यात घेतले.
त्याचे नाव रोहन प्रकाश अंगारके, वय २२ वर्षे, रा. गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेता त्याचे कब्जात एकुण २,७६,०००/- रु.कि.चा मुद्देमाल त्यामध्ये १,३६,०००/-रु.कि.चा ६ ग्रॅम ८० मिलीग्रॅम, मॅफेड्रॉन (एम.डी.) असा अंमली पदार्थ, १,२५,०००/- रू.कि.ची एक काळया रंगाची बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रीक स्कुटर तिचा नं. एम.एच. १२/वाय. जे.५१६३ व १५,०००/- रू.कि.चा विवो कंपनीचा मोबाईल असे अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, संगनमताने, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४२१/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास हे सहा. पोलीस निरिक्षक उमाकांत महाडिक, हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त परि-०५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय कुमार डोके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक-उमाकांत महाडिक, व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, दिपक क्षीरसागर या विशेष पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

