दरोडा विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगारांस अटक, ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुसे जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त साो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध्यरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेवुन त्यांचेविरुध्द कडक कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते. त्याअनुशंगाने आमचे व श्री बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ पि चिं चे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकचे व. पो. नि. श्री बाळकृष्ण सावंत अधिकारी व अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती घेत होते.
दरोडा विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार हे अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगांराची माहिती घेत असताना पोलीस शिपाई ब.नं. २६७३ सुमित देवकर व पोलीस शिपाई ब.नं. २६४३ गणेश सावंत यांना त्यांचे गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने दि. १२/०१/२०२४ रोजी पथकाकडील पो.उप.नि. भरत गोसावी तसेच पो.हवा १०६२ गणेश हिंगे, पो.शि. २६७३ सुमित देवकर, पो.शि. २९४७ विनोद वीर व पो.शि. २६४३ गणेश सावंत यांनी रेकॉर्डवरील आरोपी नामे ब्रम्हदेव माधव लटपटे, वय २३ वर्षे, रा इंद्रायणीनगर, २ नं गल्ली, आळंदी देवाची, ता खेड, जि पुणेब्रम्हदेव माधव लटपटे, वय २३ वर्ष, रा इंद्रायणीनगर, २ नं गल्ली, आळंदी देवाची, ता खेड, जि पुणे यास आळंदी रस्ताच्या आळंदीकडे जाणाऱ्या बाजूस सर्विस रोडच्या कडेला, मॅग्जीन चौक, दिधी, पुणे येथुन १६.४५ वा ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०१ लोखंडी पिस्टल व ०१ . वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्हयाचा तपास दरोडा विरोधी पथकाकडे आल्यावर तपासादरम्यान जिवंत काडतुसे जप्त करुन त्याचेविरुध्द दिघी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. पिंपरी चिंचवड, अप्पर पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्री बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, सागर शेडगे, महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण माने, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, समीर रासकर, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

