कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मोक्का मधील फारार आरोपीस केले जेरबंद….
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे ,पोलीस अंमलदार शाहिद शेख,लक्ष्मण होळकर,संतोष बनसुडे, सुजित मदन,सूरज शुक्ला गोरख चिनके व निलेश देसाई असे हद्दीत निवडणुकीच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सूरज शुक्ला व सुजित मदन यांना चतूर्शृंगी पोलीस स्टेशन गु .र.क्र -751/2023 भा.द.वी कलम 307,323,141,144,147,148,149 सह क्रिमिनल लॉ अमेडमेंट कलम 7 ,म.पो.का.अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम(मोक्का) मधील सहा महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपी नामे हर्षद सतीश चांदणे वय 21 वर्षे धंदा – भाजीची गाडी रा – राजीव गांधी नगर बुद्धविहारा जवळ खडकी पुणे सदर चा आरोपी हा कमेला चौक कोंढवा येथे आलेला असल्याची गुप्त माहिती मिळताच वरील स्टाफ च्या मदतीने सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

