मौज मजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, चोरीच्या २ मोटार सायकल केल्या जप्त.आरोपीकडून १ लाख, १० हजार, किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.


पंकेश जाधव संपादक 7020794626

विश्रामबाग पोलिस स्टेशन पुणे शहर.

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाहन चोरीचे गुन्हे रोखण्याकरीता व दाखल गुन्हे उघडकीस आणण्याकरीता करावयाच्या उपाययोजना बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन श्रीमती दिपाली भुजबळ, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अरुण घोडके यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे व पोलिस अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले असता त्यांनी मोटार सायकल चोरी झालेल्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारामार्फत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशियतांचा शोध घेतला असता अमित दत्तात्रय चाटे वय २३ वर्षे रा. मानेपार्क, उचगांव ता. करवीर जि. कोल्हापुर याने विश्रामबाग पोलीस स्टेशन गुरनं.५०/२०२४ भादंविक ३७९ मधील दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी हा नवी पेठ पुणे या परिसरात राहण्यास असल्याचे बातमीदारामार्फत समजले.

Advertisement

त्या प्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पो.उप.निरी. मनोज बरुरे व पोलिस स्टॉप यांनी सतत ०४ दिवस कसोशीने शोध घेवुन सापळा रचुन आरोपी नामे अमित दत्तात्रय चाटे यास नवी पेठ, व्यंकटेश अपार्टमेंन्ट सोसायटीच्या पार्किंगध्ये ताब्यात घेतले. त्याच्याकडे विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा क्रमांक ५०/२०२४ भा.दं. वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने नमूद गुन्हयातील तसेच यापुर्वी विश्रामबाग पोलीस ठाणे, गुरनं २६७/२०२३ भादंविक ३७९ सुझुकी अॅक्सेस ही गाडी देखील त्यानेच चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यास अटक करुन त्याचे कडुन एकुण ०२ मोटार सायकल जप्त करुन विश्रामबाग पोलीस ठाणे कडील एकुण ०२ गुन्हयांची उकल करुन १,१०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली भुजबळ पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अरुण घोडके तसेच पो.उप. निरी. मनोज बरुरे, सपोफौ राकेश गुजर, पोलिस अमंलदार रेवण कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, अर्जुन थोरात, अर्जुन कुडाळकर यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!