सख्या मेव्हण्याची मध्यप्रदेश येधील कुस्ती पैलवानास सुपारी देवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-यास केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०४/०२/२०२४ रोजी रात्रौ २२/३५ वा. सुमा फिर्यादी वय ३१ वर्ष रा. आपटे रोड पुणे हे आपले हॉटेल बंद करुन राहते घरी आले असताना दोन इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांचे जवळ येऊन काही कारण नसताना त्यांचे तोंडावर लाल तिखट टाकुन कोणत्या तरी हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन त्यांचा खुनाचा प्रयत्न केला बाबत डेक्कन पोलीस स्टेशन गुरनं २०/२०२४ भादंवि कलम ३०७,३२४,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना युनिट १ कडील पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, निलेश साबळे यांनी गुन्हयाचे घटनास्थळापासुन बालगंधर्व चौक, वृधेश्वर घाट, पुणे मनपा, गाडीतळ चौक, मालधक्का चौक ठिकाणचे सविस्तर सीसीटीव्ही फुटेज पाहुन संशयीत आरोपी माहिती घेवुन मार्ग काढुन संशयीत आरोपी हे पुणे स्टेशन येथे गेले बाबत निष्पन्न केले.
सदर सीसीटीव्ही फुटेज व्दारे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयाचा तपास करुन निष्पन्न झालेला आरोपी नामे महेश महादेव ठोंबरे वय २८ वर्ष रा. जुना बस स्टॉप संगमवाडी पुणे सध्या आगरवाल तालीम, कसबा पेठ पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाच्या अनुशंगाने व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करता त्याने सदर गुन्हा फिर्यादीचे दाजी यांचे सांगणेवरुन ५० हजार रुपायांची सुपारी देवुन इसम नामे पैलवान फैजल खान व त्याचे दोन मित्र रा. मध्यप्रदेश यांचेसह केला असलेबाबत समक्ष सांगितले आहे.
इसम नामे महेश ठोंबरे याचा सांगणेवरुन फिर्यादीचे दाजी इसम नामे अश्विनीकुमार शेषराव पाटील वय ५२ वर्ष रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटेरोड, शिवाजीनगर, पुणे. यास ताब्यात घेवुन त्यास युनिट १ कार्यालयात आणुन त्याचेकडे तांत्रिक विश्लेषण व केलेला तपास आधारे तपारा केला असता त्याने सदर गुन्हयांची कबुली दिली आहे.
तरी आरोपी नामे महेश महादेव ठोंबरे (पैलवान), फैजल खान (पैलवान) यांनी अश्विनीकुमार पाटील यांचे सांगण्यावरुन सदर गुन्हयामध्ये पुर्व नियोजीत कट रचुन गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींना पुढील कार्यवाही कामी डेक्कन पोलीस ठाणे पुणे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे. श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १. श्री. सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १, शब्बीर सय्यद सहा. पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस अंमलदार दता सोनावणे, महेश बामगुडे, शुभम देसाई, निलेश साबळे, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, अभिनव लडकत यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

